नाशिक जिल्ह्यातील रयत परिवारा कडून शहरात संयुक्त कर्मवीर जयंती साजरी

संजय उकिरडे / प्रतिनिधी
बुधवार दिनांक 30/ 9/ 2026 नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने संयुक्त कर्मवीर जयंती साजरी करण्यात आली .
कर्मवीरांच्या कार्याची ओळख शहरातील लोकांना व्हावी यासाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री भगीरथ काका शिंदे यांच्या पुढाकाराने या जयंतीचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे, कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आणि उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष रोहित दादा पवार तसेच रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी तसेच उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी श्री नवनाथ बोडके उपस्थित होते .

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते पत्रकार श्री मधुकर भावे उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी राज्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली यामध्ये प्रामुख्याने नाशिकचे खासदार श्री वाजे साहेब खासदार श्री भगरे साहेब नाशिक जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री नितीन ठाकरे साहेब व आयएएस अधिकारी श्री आंधळे साहेब उपस्थित होते.
सदर जयंती कार्यक्रमांमध्ये नाशिक शहरांमधून कर्मवीरांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले जिल्ह्यातील विविध शाखातील विद्यार्थ्यांनी लेझीम टिपरी दांडिया व विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले फेरीचे आकर्षण म्हणजे कर्मवीर अण्णांचा रथ तसेच आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेले तारफा नृत्य, गोंधळी नृत्य होते. बाल गोंधळी सोबत फोटो काढण्याचा मोह शिक्षण मंत्र्यांनाही आवरला नाही अशा प्रकारे कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला सभेचा मुख्य कार्यक्रम मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच कलाशिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.



