इतर

टाकळी ढोकेश्वर चा पोरगा बनला आंतरराष्ट्रीय चित्रकार।”



संजय उकिरडे /प्रतिनिधी

चित्र महणजे केवळ रंग, रेषा आणि आकारांची मांडणी नसुन त्यात कलाकाराच्या भावना, समाजाचे वास्तव आणि अनेक प्रतीकांचे अर्थ दडलेले असतात. यासाठी गरज असते ती ते चित्र संवेदनशील नजरेने वाचण्याची.

      ग्रामीण भागात जन्म घेऊन परिस्थितीच्या मर्यादांवर मात करत आपल्या आवडीच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र टाकळी ढोकेश्वरसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले नारायण बाळकृष्ण शेळके यांनी आपल्या चित्रकलेच्या छंदाचेच जीवनध्येयात रूपातंर करून राष्टीय आणि आंतरराष्टीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे

एकवेळ चित्रात रंग भरणे सोपे,मात्र जीवनाच्या चित्रातील संकटांना रंग देणे कठीण असते, आर्थिक अडचणी, मर्यादित साधने आणि संर्षाची परिस्थिती यांचा सामना करत नारायण यांनी चित्रसाधना सुरू ठेवली. प्रसंगी एक वेळचे जेवण करून आणि छोटयाशा खोलीत राहूनही त्यांनी कलेशी असलेले नांते तुूट्र दिले नाही
“ग्रामीण भागातील मुलं कुठेही कमी नाहीत, हा आशावाद नारायण यांच्या प्रवासातून अधोरेखित होतो. प्रसिद्धी आणि यश मिळूनहीनही मातीतली नाळ कायम ठेवत ते आजही तित्क्याच तन्मयतेने कैंनव्हासवर निसर्गाच्या विविध छटा साकारत आहेत
कोरडवाहू शेतीमध्ये कष्ट करणान्य आर्ड-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या नारायण शेळके यांनी बालपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासली श्री ढोकेश्वर विदयालय टाकळी ढोकेश्वर या शाळेत असतानाच [चेत्रकला fशक्षक सांगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. चित्र काढताना ते इतके तल्लीन होत की आजुबाजूच्या जगाचाही त्यांना विसर पडत असे
सन २००८ नंतर त्यांच्या चित्रकलेला व्यापक लोकमान्यता मिळू लागली. राज्य, राष्टीय तसेच विविध स्तरांवरील चित्रकला स्पर्धांमध्ये त्यांच्या नावाची दखल घेतली जाऊ लागली. चित्रकलेतील उल्लेखनीय ‘ कामगिरीबद्रल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या चित्रकलेची सार्वजनिक स्तरावरहीं दखल घेतली गैली .
टाकळी ढोकेश्वर शाळेच्या मैदानावर बसून चित्र काढणारा हा विघार्थी आज चित्रकला क्षेत्रात दूरवर पोहोचला आहे. एका छंदांचे ध्येयात आणि ध्येयांचे कर्तूत्वात रूपातर करणाऱ्या नारायण शेळके यांच्या यशाचा प्रवास ग्रामीण भागातील अनेक होतकरू कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
नारायण शेळके यांची चित्रे विविध कला प्रदर्शनांमध्ये झळकली असून चित्रकला क्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये विशेषतः पेन्सील रेखाटने व निसर्गचित्रणाची छाप असल्यांचे विविध दिसते
शालेय शिक्षणानंतर आसपास अनेक मित्रांनी आपापल्या क्षेत्रात मार्गक्रमण केले. मात्र नारायण शेळके यांनी पारंपरिक मार्ग न स्वीकारता चित्रकलेचें तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, मुलाने घराला हातभार लावावा, अशी सर्वसामान्य अपेक्षा असतानाही त्यांच्या आई-वडिलांनी आणि मोठया भावाने त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले
आज चित्रकलेच्या प्रशिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले जाते. देशातील विविध ठिकाणी तसेच परदेशातही त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित झाली आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button