इतर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळस (ता.वेंगुर्ला) येथे विद्यार्थांनी राबविला पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम ¡

संजय उकिरडे /प्रतिनिधी

श्री शिवाजी हायस्कूल तुळस ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग चे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजकार्यात दुष्काळ सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा सामाजिक बांधिलकी जोपासत सहभाग घेतला.

संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात ट्रीगर 1 लागू करण्यात आला आहे याचे नियोजन म्हणून ग्रामपंचायत तुळस च्या वतीने बंधाऱ्याचं आयोजन आज दिनांक 2 ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल तुळस च्या विद्यार्थी विद्यार्थिनीनीच्या मदतीने आणि ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ यांच्या मदतीने बंधारा बांधण्यात आला.

त्यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच रश्मीताई परब,उपसरपंच नारायण कुंभार, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, रमाकांत ठुंबरे , चरित्रा परब, रतन कबरे,
पोलिस पाटील सागर सावंत,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी सुनील चव्हाण, तुळस केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.हिरेमठ सर, श्री शिवाजी हायस्कुल चे मुख्यध्यापक श्री.विनायक कोल्हे सर, श्री .संदीप तुळसकर सर, सौ. धनश्री तुळसकर मॅडम,शालेय विद्यार्थी, crp गोपिका मेस्त्री, स्वप्नाली शेळके, समीक्षा कुंभार, स्वरांगी पेडणेकर ई. सर्व उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button