इतर

रामनाथ भोजने यांचा मुंबई त शरद रत्न पुरस्काराचे सन्मान

मुंबई- येथील रवींद्र नाट्यमंदिर 7 ऑक्टोबरला शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात शरद रत्न पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील कलावंतांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये अहिल्यानगर अकोले तालुक्यातील अबिटखिड भोजनेवाडी गावचे क्रांतिका री विचारांचे रामनाथ भोजने समाजसेवक यांना सह्याद्री रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

हा पुरस्कार कामगार नेते शशिकांत शिंदे तसेच प्रा. डॉ. तेजस्विनी भिलारे यांच्या शुभहस्ते रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे प्रदान करण्यात आला हा पुरस्कार संगीता भोजने व रामनाथ भोजने यांनी स्वीकारला तसेच अकोले तालुक्यातील भंडारदरा घाटघर येथील सखाराम गांगड राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांचे कबडावना नृत्य यांनाही कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच राजा हरिश्चंद्र दिंडी वारकरी सोहळा या संस्थेला भजन सम्राट हा बहुमान देण्यात आला तसेच सातेवाडी परिसरातील नामदेव साळवे आणि पार्टी यांना संबळ व सनई वाद्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

सदर प्रसंगी शरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम व शेलार ह भ प तुकाराम महाराज आरोटे दत्ता लांगी सखाराम गांगड कार्यक्रमाचे आयोजक विनोद शिंदे दिग्दर्शक अरुण कदम दिग्दर्शक प्रकाश जाधव अध्यक्ष अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते रामनाथ भोजने यांनी या प्रतिष्ठानला भूमी दान दिल्याबद्दल सर्व थरातून रामनाथ भोजने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे व अभिनंदनच वर्षा व होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button