इतर

मुठेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल ला वसंतराव मुठे पाटील यांच्याकडून शाळेला १०० पुस्तके भेट


श्रीरामपूर (वार्ताहर) : भारतरत्न, मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी पोलीस पाटील वसंतराव मुठे पाटील यांनी मुठे वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल, जे.टी.एस. शाखेला १०० पुस्तके सस्नेह भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक काशिद सर, गर्जे मॅडम व शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वसंतराव मुठे पाटील यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित जीवन हे अनमोल, ह्या मन मंदिरातून, आठवणीतील देवमाणसं, वैभवशाली श्रीरामपूर, अमृतमंथन, वाचता वाचता तसेच पुंडलिक गवंडी कुमावत लिखित आपले पंतप्रधान, नरेंद्रजी मोदी, आई यांसह विविध लेखकांची १०० पुस्तके शाळेला भेट दिली.
यावेळी वसंतराव मुठे पाटील यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी. वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले.
मुख्याध्यापक काशिद सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी शंकरराव पवार, जानराव दादा, शशिकांत थोरात, संदीप वलटे, लालझडे, संजय मुठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button