गंभिरेवाडी (ता.अकोले )येथे महिलांच्या सन्मानार्थ महिलांना साड्यांसह दिवाळी फराळाचे वाटप

अकोले प्रतिनिधी
श्रीराम ग्रामविकास ट्रस्ट मार्फत ” एक साडी तिच्यासाठी ” हा उपक्रम अकोले तालुक्यातील गंभिरेवाडी ( पैठण )येथे सामाजिक भावनेतून परिसरातील महिलांच्या सन्मानार्थ राबविण्यात आला ..
सामाजिक उपक्रमाअंतर्गत या परिसरातील 53 महिलांना साड्यांसह दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले ..
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पैठण गावचे सुपुत्र तथा आदिवासी समाज कृती समिती , महाराष्ट्र पुणे चे अध्यक्ष , इंजि . नामदेव गंभिरे होते ..
. अध्यक्षांनी आपल्या भाषणात उपस्थित सर्व महिला , नोकरदार वर्ग व ग्रामस्थ यांचे स्वागत करून असा कार्यक्रम दु स ऱ्यांदा आयोजित करत असलेबद्दल ” GEN -Zee ” चे मनापासून अभिनंदन केले ..
गावाचं संघटन हेच विकासाचं गुपित आहे त्यासाठी
1. मुख्य रस्ता ते ओहळ पर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम करणे .
2. नदीकिनारी अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीचे विस्थरीकरण करणे .
3. गंभिरेवाडीच्या प्राथमिक शाळेचे नियोजित बांधकाम करणे .
4. गंभिरेवाडी येथील पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधून घरोघरी नळ योजना राबविणे .
5. गंभिरेवाडी येथील अपूर्ण अवस्थेत असलेल्या ” मंदिराचे बांधकाम ” पूर्ण करणे .हे कामे पुढील 5 वर्षात करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले
अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून गावाचा विकास होणार असेल तर हि बाब इतर गावांसाठी सुद्धा प्रेरणादायी होईल असा विश्वास अनिल गंभिरे ( कृषी अधिकारी ) यांनी व्यक्त केला .
या कार्यक्रमाचे कौतुक म्हणून सौ छाया भांगरे सातव व प्रशांत सातव यांनी चि . देवांश ,कृतिका व इंजि . सचिन यांच्या वाढदिवसानिमित्त 1111/- रु ची मदत श्रीराम ट्रस्ट कडे सुपूर्द केली .
या कार्यक्रमात दैनुंजी घिगे लक्ष्मण गंभिरे , भिकाजी मेचकर ,योगेश मेचकर ,भरत घिगे ,दिपक गंभिरे ,सचिन भांगरे , इंजि सुनील भांगरे ,भाऊसाहेब गंभिरे ,दत्ता मेचकर ,अशोक गंभिरे ,निवृत्ती मे चकर ,सोमनाथ गंभिरे ,मधुकर आढळ ,उत्तम घिगे ,काशिनाथ घिगे ,सखाराम गंभिरे ,पांडुरंग घिगे ,किसन घिगे ,बाळासाहेब घिगे ,अक्षय झोंबाडे ,गोविंद घिगे ,विनोद घिगे ,राहुल घिगे ,चंद्रकांत लांडे ,विनायक घिगे ,अशोक भवारी ,सोमनाथ घिगे , देवराम मेचकर ,विलास घिगे ,युवराज घिगे ,विशाल गंभिरे ,योगेश बुळे ,प्रा . संजय घिगे ,तुकाराम गंभिरे ,अमोल गंभिरे ,सुभाष गंभिरे ,विठ्ठल गंभिरे ,सागर गंभिरे ,नवनाथ आढळ ,सुनील गंभिरे ,सोमनाथ गंभिरे ,देवराम घिगे , सदू गंभिरे ,किरण आढळ ,सोमनाथ आढळ ,रामदास घिगे ,दत्ता गंभिरे ,शरद आढळ ,दिलीप मेचकर ,यशवंत घिगे ,संदीप घिगे ,किसन घिगे ,मंगेश भांगरे ,हरीश साबळे ,पोपट लांडे ,निवृत्ती गंभिरे ,अशोक गंभिरे ,समाधान घिगे ,अमोल मेचकर ,त्याच प्रमाणे सौ निशा गंभिरे , विमलताई मेचकर , सुमनबाई भवारी , शांताबाई गंभिरे , घमाबाई गंभिरे , लताताई गंभिरे इत्यादींसह अनेक महिलांनी सहभाग नोंदविला .. मुंबई , पुणे स्थित नोकरदार वर्ग व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य, समन्वय व उत्तम नियोजनातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला .


