सांगलीत सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात साजरी

डॉ शाम जाधव
सांगली- आज दिनांक३/१/२०२५ रोजी स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या
जयंती निमित्त सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानात अभिवादन करण्यात आले.
माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रावस्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष डाॅ.सुधीर कोलप व आशाताई साबळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी माजी उपायुक्त चंद्रकांत चौधरी,बौध्दाचार्य दयानंद कांबळे,आप्पासाहेब साबळे,अजय उबाळे,सचिन ऐवळे अविनाश कांबळे,शंकर कांबळे,गजानन गस्ते,बाबासाहेब गाडे,कन्हैया जगधने,शिवाजी वाघमारे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत चौधरी यांनी माता सावित्रीबाई यांच्या जन्मापासून केलेल्या कार्याचा वृत्तांत सांगितला खऱ्या अर्थाने स्त्रियांना शिक्षणाच्या खऱ्या अर्थानं प्रथम शिक्षण देऊन भारतामध्ये क्रांतीची बीजे रोवली. पहिल्या महिला शिक्षक होत्या त्याचा जन्म 3 जानेवारी १९ ३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला वयाच्या दहाव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला