इतर

वैभवराव पिचड यांच्या पाठपुराव्याने कोतूळ परिसरात शेतीला दिवसा वीज!

कोतुळ प्रतिनिधी

माजी आमदार व आदिवासी विकास महामंडळाचे संचालक वैभवराव पिचड यांच्या प्रयत्नामुळे कोतुळ परिसरातील शेतकऱ्यांना आता दिवसा पुरवठा सुरू झाला आहे यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात वीज वितरण शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा करत होती सध्या थंडीचे दिवस सुरू आहे त्यातच सायंकाळी बिबट्याची भीती आहे अशामुळे शेती पिकांना पाणी भरणे अतिशय भीतीचे वाटत होते वीज वितरणचा शेतीला रात्री मिळणारा वीजपुरवठा यामुळे रात्री बे रात्री पिकांना पाणी भरणे अतिशय धोक्याचे बनले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला वीजपुरवठा दिवसा करावा अशी मागणी केली होती यावरून सचिन गिते, धनंजय देशमुख अशा काही शेतकऱ्यांनी कोतूळ येथील वीज वितरण कार्यालयावर टिकाव खोरे घेऊन जातं अधिकाऱ्यांना जाब विचारला

परिसरात बिबट्याची मोठ्या प्रमाणात भीती आहे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे यामुळे रात्रीचे घराबाहेर पडणे अवघड आहे अशात रात्रीचा पाणीपुरवठा शेतीला पाणी कसे देणार म्हणून दिवसा वीज पुरवठा करा अशी मागणी केली अधिकाऱ्यांनी याबाबत सुरुवातीला उडवा उडवी ची उत्तरे दिली मात्र शेतकऱ्यांनी माजी आमदार वैभव पिचड यांना संपर्क केला व हि बाब लक्षात आणून दिली त्यानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी तात्काळ शेतीला दिवसा वीज पुरवठा करा अशा सूचना दिल्या वरिष्ठांना केल्या माजी आमदार वैभव पिचड यांच्या पाठपुराव्यामुळे कोतुळ परिसरात आता शेतीला दिवसा वीज पुरवठा सुरू झाल्याने पिकांच्या भरण्या आता दिवसा शेतकरी करू लागले आहे यामुळे शेतकऱ्यांनी माजी आमदार पिचड व वीज वितरण चे आभार मानले

दिनांक २४ डिसेंबर पासून कोतुळ परिसरात विज वितरण ने सकाळी सहा ते बारा व दुपारी बारा ते सहा अशा दोन टप्प्यात सहा तास शेतीसाठी वीजपुरवठा सुरू केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button