शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव च्या तत्कालीन तहसीलदार व सध्या अन्नधान्य वितरण अधिकारी अहमदनगर या ठिकाणी कार्यरत असलेल्या अर्चना पागिरे/भाकड यांना शासकीय सेवेतून त्वरित निलंबित करा या मागणीसाठी जेष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे हे 31 जानेवारी पासून बेमुदत उपोषणास बसणार आहे
श्री काळे यांनी याबाबाबत निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की अर्चना पागिरे – भाकड कुटुंबियांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच शेवगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी संतोष गर्जे यांची त्वरित जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी शासकीय धान्य काळाबाजार करणाऱ्या तालुक्यातील रेशन माफियांची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी सर्व धान्य दुकानदाराकडून पॉस मशीनची बिल देण्यास सक्ती करण्यात यावी या मागण्या साठी श्री हरिभाऊ दादा काळे (राहणार वडुले बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर) हे जिहाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे कार्यालतासमोर उपोषणास बसणार आहे
शेवगाव च्या तत्कालीन तहसीलदार अर्चना पागिरे भाकड अहमदनगर येथे कार्यरत असताना त्यांनी शेवगाव मध्ये मुरूम वीटभट्टी साठी माती उत्खनन, वाळू विक्री हे सर्व रॉयल्टी न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला त्याचप्रमाणे रेशन माफियांशी संगनमत करून करोडो रुपयांच्या रेशन मालाचा काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे व संतोष गर्जे या कर्मचाऱ्यां कडून गैर मार्गाने होणारी जनतेची लूट होत आहे या त्रासाबाबत मी दिनांक 31/1/2022 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहे या काळात माझे काही बरेवाईट झाले तर त्यास पुर्ण शासन जबाबदार राहील व याबाबत माझ्याकडे काही ठोस पुरावे आहेत असे हरिदादा काळे यांनी सांगितले



