राष्ट्रवादी काँग्रेस भटके विमुक्त सेल नाशिक जिल्हा अध्यक्षपदी अजित शिंदे यांची निवड

नाशिक प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार )पार्टी च्या भटके विमुक्त (VJNT) सेल) च्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी अजित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे
बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस( भटके विमुक्त सेल) चे प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड यांच्या आदेशाने नुकतीच ही निवड करण्यात आली
निफाड तालुक्यातील सारोळे (क) पो. कनसगाव येथील श्री. अजित भास्करराव शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर यांच्या शिफारशी नुसार श्री अजित शिंदे यांची निवड करण्यात आली त्यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, करण सिंग बावरी प् आणि एडवोकेट साहेब माजी न्यायाधीश एडवोकेट संजय जोरे आदी यावेळी उपस्थित होते



