इतर

गावात मंदिरांबरोबर ज्ञानमंदिर देखील महत्त्वाचे- आमदार लहामटे

अबितखिंड येथील भोजनेवाडीत नवीन शाळा इमारती चे उदघाटन

अकोले प्रतिनिधी 

अकोले तालुक्यातील  अबितखिंड येथील भोजनेवाडी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न झाला  अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या शुभहस्ते तसेच पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमावत,मंत्रालय  मुंबई  चे   जनसंपर्क अधिकारी राजू जगधने, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला 

 गावात मंदिरा बरोबरच   ज्ञान मंदिर देखील महत्त्वाची आहे म्हणूनच अकोले तालुक्यात 200 ते 250 शाळा खोल्या नव्याने दिल्याचे आमदार  डॉ  किरण लहामटे  यांनी यावेळी सांगितले भोजनेवाडी शाळेसाठी  आणखी एक शाळा खोली देऊ तसेच परिसरातील  विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे ही आमदार डॉ  किरण लहामटे म्हणाले 

यावेळी  सरपंच यमुनाताई घनकुटे, चेअरमन जानकीराम  गोडे, युवा कार्यकर्ते प्रदीप गोडे, पत्रकार सुनील गिते,  रामनाथ भोजने, मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे,  भोजनेवाडी शाळेच्या मुख्याध्यापक

 मंगलताई गायकवाड, शिक्षक श्री कुंडलिक  शिंदे शालेय पोषण अधीक्षक श्री  हासे  केंद्र प्रमुख जनार्दन भवरे,माजी मुख्याध्यापक लक्ष्मण भोजने, ग्रामसेवक सुकटे भाऊसाहेब,  शिक्षक श्री वायळ नामदेव भोजने, सावळीराम मुठे, दुलाजी भोजने, ठका भोजने, मारुती भवारी, विश्वनाथ घनकुटे, भागा भोजने, संजय देशमुख, रोहिदास देशमुख,दिगंबर भवारी, सर्व पालक वर्ग विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने  कार्यक्रमासाठी उपस्थित होते 

 भोजनेवाडी शाळेचे माजी विद्यार्थी रामनाथ भोजने  यांनी  आपल्या मातोश्री स्वर्गीय बुधाबाई नामदेव भोजने यांच्या स्मणार्थ भोजने भोजनेवाडी शाळेला एक टेबल दोन खुर्च्या ची भेट दिली तर रोहिदास देशमुख संजय देशमुख यांनी आपले वडील स्वर्गीय भास्कर शिवराम देशमुख यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने भोजनेवाडी शाळेला एक टेबल दोन खुर्च्या देण्याची जाहीर केले

—————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button