रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित हाट बाजार उत्साहात संपन्न

नाशिक प्रतिनिधी
शेतकरी तसेच लहान व मध्यम उद्योजकांना एकत्र आणून त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी व त्याद्वारे त्यांना प्रोत्साहन द्यावे ह्या हेतूने रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे उदोजी मराठा शाळेमध्ये हाट बाजारचे आयोजन केले होते. या बाजारात 55 स्टॉल्स होते .या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
सदर हाट बाजाराचे उद्घाटन माझी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा पद्धतीच्या हाट बाजाराचे नियमितपणे आयोजन करण्याचे आवाहन केले .रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी हाट बाजारात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवावा ,असे प्रतिपादन केले .
रोटरी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक उपक्रम राबवत असते. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून डॉ.गौरव सामनेरकर यांच्या हस्ते गरजू महिलांना धूर विरहित शेगड्या भेट देण्यात आल्या. यावेळी सिंधू
सागर अॅकेडमी, ग्लोबल व्हिजन आणि विजडम हायस्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. रोटरीचे माजी अध्यक्ष मंगेश अपशंकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या हाट बाजाराचे आयोजन व नियोजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.नेहा मेहेर ,मोना सामनेरकर ,किशोर थेटे नैना सोनजे आणि सुधीर वाघ यांनी केले.
मंगेश अपशंकर, अॅड .मनीष चिंधडे,प्रफुल्ल बरडिया ,ओम प्रकाश रावत ,शिल्पा पारख ,तसेच रोहित देशपांडे प्रणाली देशपांडे अमित पगारे अॅड .राजश्री बालाजी वाले, हेमराज राजपूत, चेतन पवार, निलेश सोनजे , डॉ.सोनाली चिंधडे व स्मिता अपशंकर यांनी या कार्यक्रमासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.



