इतर

अकोल्यात शीररपुंजे येथील भैरवनाथ गडावर भविकांची गर्दी

विलास तुपे      
राजूर /प्रतिनिधी  

अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील भैरवनाथ गडावर आज दिवाळीच्या पूर्वसंधेला भाविकांची एकच झुंबड उडाली होती भैरवनाथ गड हे शिरपुंजे चे गावाचे पायथे पासून साधारण चौदाशे मीटर उंच गडावर आहे
या यात्राला वाट असे ही म्हणतात वाट म्हणजे ज्या महिलांना मुले होत नाही त्या महिला पायथ्यापासून केसाने रोड झाडीत गडावर जातात यालाच वाट असे म्हणतात अशी जुनी जाणकार ग्रामस्त सांगतात

आज यात्रेसाठी 25 ते 30 हजार भाविकांनी हजेरी लावलेने गडा वर एकच झुंबड उडाली होती जागो जागी वन्यजीव विभागाने रेलिंग लावल्याने भाविकांचा थोडा त्रास काहीसा कमी झाला होता तसेच राज्याच्या कानेकोपरेतून भाविकांनी हजरी लावली.

आदिवासी समाजाचे दैवत असल्यामुळे येथील आदिवासी समाज भात पिकाचे नैवेद्य म्हणून पहिले भैरवनाथाला गडावर जात असतात दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा भरते तसेच वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 गार्ड व 50 स्थानिक मुलांच्या मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच राजुर पोलीस स्टेशनच्या वतीने जागोजागी होमगार्ड व पोलीस तैनात करण्यात आले होते या वेळी आ.डॉ किरण लहामटे तसेच तसेच माजी जि. प. अध्यक्ष अशोकराव भांगरे सौ सुनीता ताई भांगरे यांनी ही भेट दिली.तसेच शिरपुंजे गावचे सरपंच भाऊ धिंदळे विजय घोरपडे साईनाथ धिंदळे मोहन धिंदळे माजी सरपंच हायबत धिंदळे, गंगाराम धिंदळे, दारकू महाराज धिंदळे व भैरवनाथ तरुण मित्र मंडळ वतीने यात्रेत लक्ष ठेवून होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button