अहमदनगर
निवृत्ती महाराज देशमुख यांचे
निवृत्ती महाराज देशमुख यांचे
कोतुळ येथे शनिवारी कीर्तन

कोतुळ प्रतिनिधी
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तनाचा कार्यक्रम कोतुळ येथे आयोजित करण्यात आला आहे
शनिवार दिनांक 23 /4/2022 रोजी सकाळी 9 ते 11 30 वाजता कोतूळ येथील जानवी लॉन्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी तुकाराम देशमुख यांचे बंधू स्वर्गीय बाबासाहेब तुकाराम देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी तुकाराम देशमुख, अभिषेक बाबासाहेब देशमुख ,सौ हर्षदा प्रशांत करपे , अभिजित शिवाजी देशमुख , कौंस्तुभ बानासाहेब देशमुख , कल्याणी शिवाजी देशमुख यांनी केले आहे