इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१३/०४/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २३ शके १९४८
दिनांक :- १३/०४/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २५:०९,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति १६:०४,
योग :- शुभ समाप्ति १७:१७,
करण :- बव समाप्ति १३:१९,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:११ ते ०६:४४ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१५ ते ०७:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:११ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:११ ते ०६:४४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
वरुथिनी एकादशी, श्रीवल्लभाचार्य जयंती, घबाड १६:०४ नं. २५:०९ प., दग्ध २५:०९ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २३ शके १९४८
दिनांक = १३/०४/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)

मेष
मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. लबाड लोकांपासून सावध राहावे.

वृषभ
मानसिक चंचलतेवर मात करावी लागेल. खर्चाला आळा घालावा लागेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

मिथुन
व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. कामात चांगली ऊर्जितावस्था येईल. चांगल्या कमाई साठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल. कामात प्रगतीला वाव आहे.

कर्क
कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. चित्त एकाग्र करावे लागेल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. चारचौघात तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवावा.

सिंह
धार्मिक सेवेत सहभाग नोंदवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल. आदर्श वागणुकीतून कौतुकास पात्र व्हाल. तुमच्या सामाजिक दर्जा सुधारेल.

कन्या
काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे. एककल्ली विचार करू नका. भागीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील संभ्रम बाजूस सारावेत.

तूळ
भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन धोरण आजमावता येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक
आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. आत्मविश्वास बाळगावा.

धनू
अभ्यासू दृष्टिकोन बाळगावा. स्व‍च्छंदीपणे विचार मांडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल.

मकर
विचारांची दिशा बदलून पहावी. भावंडांची काळजी लागून राहील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. कौटुंबिक गोष्टीत प्रभुत्व दाखवाल.

कुंभ
बोलताना सारासार विचार करावा. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल. जवळचा प्रवास घडेल.

मीन
घरगुती कामाचा ताण जाणवेल. विचारणा योग्य दिशा द्यावी. बौद्धिक ताण घेऊ नये. नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button