दिल्ली येथे होणाऱ्या आदी कर्मयोगी अभियानासाठी अकोल्याचे रामनाथ भोजने दिल्लीला रवाना

अकोले प्रतिनिधी
भारत सरकार जनजाती कार्य मंत्रालय यांच्यावतीने विज्ञान भवन दिल्ली येथे होणाऱ्या आदी कर्मयोगी अभियानाच्या प्रशिक्षणासाठी आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते रामनाथ भोजने यांची निवड झाली आहे ते 17 ऑक्टोबर2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार महाराष्ट्रातून निवडक व्यक्तींची यासाठी निवड करण्यात आली आहे
आदिवासी भागातील ठाणे,पुणे,नगर, नाशिक या जिल्ह्यातील आदिवासी समाजाची गेली 40 वर्षापासून ते सेवा करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे
श्री रामनाथ भोजने यांच्या आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत नाशिक आयुक्त कार्यालय तसेच ठाणे जिल्ह्यातून शहापूर चे प्रकल्प अधिकारी यांनी त्यांची निवड केली आहे
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणकारी सेवा संस्था कर्मचारी अधिकारी यांचे वतीने तसेच अबिटखिंड गावचे सुपुत्र म्हणून भैरवनाथ सेवा मंडळ नोकर स्टाफ कमिटी ग्रामीण व मुंबई चे पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे



