कोतुळ ग्रामपंचायतला वीज वितरण शॉक पथदिव्यांचा che तब्बल एक कोटी 18 लाख विज बिल
अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामपंचायतला वीज वितरण कंपनीने विजेचा शॉक दिला आहे
यापूर्वीच्या वीज वापराचे तब्बल एक कोटी 18 लाख 16 हजार 578 रुपयाचे विज बिल दिले असून हे वीज बिल न भरल्यामुळे कोतुळ ग्रामपंचायत चा पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे
कोतुळ ग्रामपंचायत मार्फत कोतुळ शहरात व साबळेवाडी हांडेवाडी भांडेवाडी अशा वाड्या-वस्त्यांवर ठिकाणी पथदिव्यांची स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यात आली आहे ही व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून सुरळीत सुरू असताना वीज वितरण च्या कंपनीने यापूर्वीच्या वापराचे विज बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे
यामुळे भर पावसात आता कोतुळकर दिव्यांच्या लखलखाटाला मुकले आहे वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावात ठिकाणी पथदिवे उभे राहिले मात्र हे पथदिवे आता शोभेचे नवले बनले आहे गेल्या दहा ते बारा दिवसापासून हे पथदिवे बंद आहे गेल्या काही दिवसापासून बाजारपेठेतील पथदिव्यांचा प्रकाश बंद झाला आहे यामुळे वाड्या-वस्त्यांवर आता वाघाच्या भीतीमुळे नागरिक भयभीत झाली आहे या पथदिव्यांचा विज बिल अनेक वर्षापासून शासन व जिल्हा परिषदे चे स्तरावर यापूर्वी भरले जात होते मात्र एप्रिल 2019 नंतरच्या काळापासून शासनाच्या धोरणात बदल झाल्याने हे बिले ज्या त्या ग्रामपंचायतीने भरावे असा निर्णय शासनाने घेतला आहे यामुळे विज बिल स्टेट लाईटचे विज बिल भरणे आता ग्रामपंचायतीला जड जाऊ लागले आहे
शासनाच्या धोरणाप्रमाणे ग्रामपंचायतींकडून वीज बिल येत नसल्याने वसूल होत नसल्याने वीज वितरण ने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण स्वीकारले आहे कोतुळ ग्रामपंचायतचे पथदिव्यांची कोतुळ शहरासाठी तीन व साबरवाडी हांडेवाडी भांगेवाडी असे तीन एकूण सहा कनेक्शन आहेत या सहा कनेक्शनचे एकूण एक कोटी 18 लाख 16 हजार 570 रुपये चे विज बिल वीज वितरण ला घेणे असल्याने लाईटचे कनेक्शन खंडित वीज कनेक्शन खंडित केली आहे यापूर्वी वीज वितरण ग्रामपंचायतला सूचना देऊनही वीज बिल न भरल्याने ही कारवाई केल्याचे येथील वीज कक्ष अभियंता सहाय्यक अभियंता श्री अमोल कळंबे यांनी सांगितले
ही वसुली
तात्काळ हे पैसे तात्काळ वीज वितरण कडे जमा करावे असे म्हटले आहे
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे ग्रामीण भागातशेती कामाची लगबग सुरू आहे पाऊस सुरू आहे बिबट्या व वन्य प्राण्यांची दहशत आहे अशा वातावरणात पथ दिव्यांचा प्रकाश बंद झाल्याने नागरिकांना अंधारातच चाच पडावे लागत आहे
याबाबत ग्रामपंचायत कोतुळ करून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने वीज वितरण वसुलीसाठी ठाम आहे
दरम्यान याबाबत वीज वितरण चे कोतूळ येथील सहाय्यक अभियंता अमोल कळंबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने जनतेची गैरसोय होत आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे दरम्यान याबाबत वीज बिलाबाबत ग्रामपंचायत आणि वीज वितरण या दोघांकडूनही कोणत्याही प्रकारची वाटाघाटी सुरू नसल्याने नागरिक अंधारात आहेत



