आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०४/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण १३ शके १९४८
दिनांक :- ०४/०८/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०७:०१,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति २२:०४,
नक्षत्र :- रेवती समाप्ति २१:५४,
योग :- धृति समाप्ति १९:३३,
करण :- गरज समाप्ति १०:३३,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:४८ ते ०५:२५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३५ ते ०२:१२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४९ ते ०५:२५ पर्यंत,
❀ दिन विशेष:
अमृत २१:५४ नं., भद्रा २२:०४ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १३ शके १९४८
दिनांक = ०४/०८/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)
♈ मेष (Aries):
आज मनात सकारात्मकता आणि आत्मविश्वास राहील. कुटुंबात सुख-संवाद लाभेल आणि वाहन किंवा नवीन वास्तू खरेदीचे अडथळे दूर होतील.
♉ वृषभ (Taurus):
जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल आणि प्रवासातून फायदा होईल. जुन्या ओळखी भविष्यात कामी येतील, मात्र घराबाहेर वादविवाद टाळावेत.
♊ मिथुन (Gemini):
आर्थिक बाजू मजबूत राहील. नातेवाईक आणि मित्रांशी संवाद साधल्याने मानसिक ताण कमी होईल, परंतु थोडे हळवे किंवा भावूक व्हाल.
♋ कर्क (Cancer):
आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभ देणारा आहे. घरात सुख-समाधान आणि धार्मिक वातावरण राहील, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल.
♌ सिंह (Leo):
निराश न होता पुढे पाऊल टाकावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.
♍ कन्या (Virgo): मित्र-मैत्रिणींचा चांगला सहवास लाभेल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. बुद्धीवर्धक कामे कराल, मात्र बौद्धिक ताण जाणवू शकतो.
♎ तूळ (Libra):
नवीन हितसंबंध निर्माण होतील आणि कार्यक्षेत्र वाढेल. घरातील कामांमध्ये अधिक वेळ जाईल आणि कामाचे योग्य ते कौतुक होईल.
♏ वृश्चिक (Scorpio):
आध्यात्मिक कार्यात आवड वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि तरुणांच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
♐ धनू (Sagittarius): अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. वादविवाद टाळावेत आणि महत्त्वाची कामे आज शक्यतो पुढे ढकलावीत. रागावर नियंत्रण ठेवा.
♑ मकर (Capricorn): वैवाहिक जीवन सुखमय राहील आणि जोडीदाराची चांगली साथ मिळेल. व्यवसाय किंवा भागीदारीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
♒ कुंभ (Aquarius):
महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेताना सावध राहावे, अन्यथा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. कोणतेही धाडसी पाऊल उचलणे टाळावे.
♓ मीन (Pisces):
प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे, मनातील भावना व्यक्त करता येतील. अति भावनाशील होणे टाळावे आणि गोष्टी खेळकरपणे हाताळाव्यात.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



