इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ११/११/२०२३

:

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २० शके १९४५
दिनांक :- ११/११/२०२३,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १३:५८,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति २५:४७,
योग :- प्रीति समाप्ति १६:५८,
करण :- विष्टि समाप्ति २६:२६,
चंद्र राशि :- कन्या,(१३:०२नं. तुला),
रविराशि – नक्षत्र :- तुला – विशाखा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- त्रयोदशी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२४ ते १०:४८ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५९ ते ०९:२४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:०२ ते ०४:२७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
शिवरात्री, उल्कादर्शन, कुलधर्म, दीपदान, भद्रा १३:५८ नं. २६:२६ प., चतुर्दशी श्राद्ध,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २० शके १९४५
दिनांक = ११/११/२०२३
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

वृषभ
आपली मानसिकता जपावी. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.

मिथुन
आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधार्‍या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील.

कर्क
घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा.

सिंह
आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या
घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल. आपल्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ
समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

वृश्चिक
अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू
मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मकर
धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कुंभ
दिवस मजेत घालवाल. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी.

मीन
मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button