अकोलेतील खडी क्रशर वर महसूल ची कारवाई

२१ खडी क्रशर सह खाणपट्टे केले सिल
कोट्यावधीचा महसूल बुडवून सुरु होते खडी क्रशर
अकोले :प्रतिनिधी
कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल बुडून सुरू असणारे अकोले तालुक्यातील तब्बल २१ स्टोन क्रशर व काही खाणपट्टे महसूल विभागाने कारवाई करत सिल केले आहे
खाणपट्ट्यांची तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांच्या पथकाने केली. यावेळी इटीपी चलन, व्यापारी परवाना अशा विविध त्रुटी आढळल्या. राष्ट्रीय हरीत लवाद (दिल्ली) यांच्या आदेशानुसार पर्यावरण मान्यतेशिवाय गौणखनिज उत्खनन करणे व राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण खंडपीठाच्या २०२० सालच्या निर्णयाप्रमाणे दगड खाणींना
तात्पुरती परवानगी आदेश पारीत करण्यापूर्वी परवानगी देताना, संबंधित सर्वे / गट नंबर पर्यावरण समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. पर्यावरण समितीची मंजुरी घेवून, कागदपत्रे सादर करणे, परवाना नुतनिकरणापर्यंत गौणखनिजाची अवैध उत्खनन करण्यात येऊ नये, असे पत्र स्टोन क्रेशर व खाणपट्टा धारकांना देण्यात आले आहे. परवानाधारकांनी ईटीस मोजणी करुन घेणे आवश्यक आहे, परंतू त्यांनी ईटीस मोजणी केल्याचे दिसत नाही.
ईटीस मोजणीसाठी उपाधिक्षक (भूमि अभिलेख) कार्यालयात ईटीस मोजणी फी चलनद्वार भरणा करुन, ते सादर केल्यानंतरचं तात्पुरता परवाना दिला जातो. वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी दि. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ईटीस मोजणी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे पत्र २१ स्टोन क्रशर सह खाणपट्टेधारकांना देण्यात आले आहे.
यांचे वर झाली कारवाई
1)नाईकवाडी अमोल बाळासाहेब (स. न. १४२/२ विरगांव)
2) शिवाजी पुंडलिक बोडके (स. न. २३१ देवठाण)
3) सुनिल बापू पवार(स. न. ६७/४ राजुर) 4) राजेंद्र राधु भडांगे (स. न. ५७/७ राजुर)
५) गोकुळ राजेश अरोटे (स. न.६१/१, ६१/३,६९/४,६१/६, खानापूर)
6) सुदाम किसन अरोटे (स.न. ६९/९ राजुर)
७. स्वप्नील सुभाष फापाळे(स. न.२७४ बेलापुर)
8) दत्तु लक्ष्मण संगभोर (स. न.१४९/३ वाकी)
9) गोवींद भिमाजी सदगिर (स. न.३८ पोपेरेवाडी)
१०) नितीन सुरेश नाईकवाडी (स. न.२०/३ धुमाळवाडी)
११) किसन लक्ष्मण सदगिर (स. न.३७९ कोभाळणे)
१२) सुमन विठ्ठल पाडेकर (स. न.९९६, ९९७, ९९८
मुथाळणे)
१३) बबन वाळीबा सदगिदर (स. न.७८४ मुथाळणे)
१४) सचिन किसन सदगिर (स. न.३४४ कोंभाळणे)
१५) सुनंदा बाळासाहेब धुमाळ (स. न.२१/४ धुमाळवाडी)
16) धनराज बाळासाहेब आरोटे (स. न.५२/२ जामगाव)
१७) विशाल भाऊसाहेब शेणकर (स.न.४९/११, ४९/१२ अगस्तीनगर)
१८) रोहिनी गोरक्ष मालुंजकर (स.न.१४८/२ रुभोडी)
१९) अंजली त्रिंबक राउत (स. न.34/3 राजुर)
२०) शरद मनोहर रत्नपारखी (स. न.७३/६ वाशेरे)
२१) नितीन पंढरीनाथ मुर्तडक (स. न.३७४/१ राजुर)असे 21 स्टोन क्रशर व खाण पट्टे वर कारवाई करण्यात आली असून तसा अहवाल जिल्हा गौण खनिज अधिकारी अहिल्यानगर यांना पाठविला आहे
‘अकोले तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी केली असता, अनियमतेबाबत लेखी खुलासा कागदपत्रांच्या पुराव्यासह सादर करावा, असे नोटीसद्वारे त्यांना सूचित केले होते, परंतु त्यांच्या लेखी म्हणणे मुदतीत प्राप्त झाले नाही. यामुळे व शासन परिपत्रकात दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने सुरु आर्थिक वर्षासाठी मंजुर खाणपट्ट्ट्यांची ईटीएस मोजणी करून घेवून, मोजणी नकाशा सादर होईपर्यंत खाणपट्टा व स्टोन क्रेशर बंद करण्यात आले आहेत.
– किसन लोहरे, नायब तहसीलदार, अकोले



