इतर

जागतिक आयुर्वेद व योग परिषद व्हिएतनाममध्ये संगमनेरच्या नीलांबरी कोर्टीकर यांचे संशोधन सादर


संगमनेर प्रतिनिधी
व्हिएतनाममध्ये शिव इंटरनॅशनल फ्रॅटर्निटी ऑफ आयुर्वेद (सिफा) आणि शिव आयुर्वेद–योग सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मान्यतेनुसार दुसरी आंतरराष्ट्रीय आयुरहेल्थ समिट–२०२५ आयोजित करण्यात आली. हो ची मिन्ह सिटीतील नॅशनल असेंब्ली हॉल येथे झालेल्या या परिषदेत संगमनेर येथील संगीततज्ज्ञ सौ. नीलांबरी कोर्टीकर यांनी यमन रागाचा उच्च रक्तदाबावरील परिणाम या विषयावरील संशोधन पेपर सादर करून केला.

भारतीय संस्कृतीच्या दर्शनाने उद्घाटन

परिषद वेदोक्त शांतीपाठ, दीपप्रज्वलन, श्री धन्वंतरी स्तवन, योग प्रार्थना आणि योग प्रात्यक्षिकांद्वारे उत्साहात सुरू झाली. जामनगर आयटीआरएच्या संचालिका डॉ. तनुजा नेसरी, भारताचे वाणिज्य दूत महेश चंद गिरी, मारबीझमचे अध्यक्ष डॉ. नारायण जाचव, एमयूएचएस आयुष विभाग प्रमुख डॉ. गीतांजली कार्ले यांसह व्हिएतनाममधील योगतज्ज्ञ व अधिकारी उपस्थित होते.

८ देशांचा सहभाग; ७० पेपर सादर
परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

८ देशांतील तज्ज्ञांचा सहभाग

४० हून अधिक भारतीय प्रतिनिधी

१२० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ

१० व्याख्याने व ७० संशोधनात्मक पेपर सादरीकरण

आयुर्वेद व योगाच्या जागतिक प्रभावाचा विस्तार अधोरेखित करणारी ही आकडेवारी ठरली.

उल्लेखनीय कार्याची दखल

उद्घाटन सत्रात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. तनुजा नेसरी – सिफा बेस्ट आयकॉन अवॉर्ड

डॉ. नारायण जाचव – सिफा धन्वंतरी पुरस्कार

डॉ. बंदिता सतपथी – सिफा हिलिंग मास्टर पुरस्कार

श्री बिष्णुपद मोडल (व्हिएतनाम) – सिफा आयकेएस पुरस्कार

डॉ. कीर्ती शाह – विशेष गौरव

परिषदेत डॉ. नूतन कोर्टीकर व डॉ. काळे यांनीही संशोधन निबंध सादर केले. पाखरे लिखित फूड संस्कार या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.

“आयुर्वेद-योगाला सीमा नाहीत” — डॉ. एकनाथ कुलकर्णी

डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी भाषणात सांगितले की,
“आयुर्वेद आणि योग शास्त्रे आजच्या जागतिक आरोग्य समस्यांवर सक्षम उपाय आहेत. या शास्त्रांचा व्यावहारिक आणि सैद्धांतिक प्रसार सर्वांनी करणे आवश्यक आहे.”

यशस्वी समारोप

समारोप सत्रात डॉ. बंदिता सतपथी, मिस. योगी धू नगूयेन, डॉ. लक्ष्मीकांत कोर्टीकर आदी उपस्थित होते. भारतीय–व्हिएतनामी सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगले.
परिषद यशस्वी करण्यासाठी ट्रान्सलेटर किएत हॉन्ग, मिस कियु मिन, मिस विन्डी, डॉ. कमलेश महाजन, डॉ. किर्ती माती, डॉ. अनुश्री नेटके यांचे विशेष सहकार्य लाभले.

संयोजिका डॉ. शिल्पा स्वार (केसरकर) यांचा गौरव

हो ची मिन्ह सिटीतील भारतीय महावाणिज्य दूत डॉ. विप्र पांडे यांनी परिषदेत उपस्थित राहून मुख्य संयोजिका डॉ. शिल्पा स्वार (केसरकर) यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. आयुर्वेदाच्या जागतिक प्रसारासाठी त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

जागतिकीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

व्हिएतनाममध्ये या प्रमाणात आयुर्वेद–योग परिषद प्रथमच पार पडल्याने ती ऐतिहासिक ठरली आहे. भारतीय पारंपरिक वैद्यकीय प्रणालीची जागतिक स्तरावरील स्वीकारार्हता आणि प्रभाव अधोरेखित करण्यास ही परिषद निश्चितच मोलाची ठरली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button