इतर

राजुर ते साकीरवाडी रस्त्याची दुर्दशा, विद्यार्थी व प्रवाशी संतप्त

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील राजुर ते साकीरवाडी रस्त्याच्या दुर्दशेने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे

राजूर ते साकीरवाडी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते मात्र दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आर पी आय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केला आहे

साकीरवाडी परिसरातून राजूर येथील आठवड्या बाजारासाठी अनेक नागरिक येत असतात मात्र रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे यामुळे चार चाकी,दुचाकी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतं आहे

हा रस्ता लोकांची हाडे खिळखिळी करत आहे एसटी महामंडळाच्या गाड्यांचे नुकसान होत असल्याने एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर गाड्या सोडण्यास नकार देत आहेत रस्त्या अभावी गाड्या बंद झाल्यास आदिवासी भागातील नागरिकांची गैरसोय होते यामुळे साकीरवाडी- राजुर हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button