इतर

प्रयत्न करतो त्याला यशाच्या,सुखाची वाट सापडते -दंगलकार नितीन चंदनशिवे.

 –

अकोले/ प्रतिनिधी

बांधकाम गवंड्याच्या हाताखाली काम करत असताना मालाची पाटी खांद्यावर होती.अमेरिकेत पुस्तकात कविता छापली ही बातमी समजली. तेव्हा लक्षात आले कष्टाची,घामाची,मेहनतिची पाटी खांद्यावर आली,तेव्हा कविता अमेरीकेत छापली गेली.प्रयत्न करतो त्याला यशाची,सुखाची,आनंदाची वाट सापडते.असे प्रतिपादन लोकप्रिय कवी,दंगलकार नितीन चंदनशिवे यांने व्यक्त केले.

राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला व वाड्मय मंडळाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकप्रिय कवी नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या प्रसंगी दंगलकार नितीन चंदनशिवे विचार मंचावरून बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव एम.एल.मुठे,संचालक विजय पवार,निरिक्षक लहानू पर्बत,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

नितीन चंदनशिवे यांनी सांगीतलें की जिवनात नियोजन महत्वाचे असून सर्वधर्म समभाव वाढीस लागला पाहीजे.त्यासाठी मार्ग चांगला असावा.परिस्थिती बदला.आईच्या डोळयातील स्वप्न व बापाचा घामाचा थेंब वाया जाऊ देऊ नका. पंढरपुरचा विठ्ठल झालो तेव्हा आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. अत्यंत साध्या व ओघवत्या शैलीमध्ये नितीन चंदनशिवे यांनी अनेक प्रसंग विनोदी शैलीमध्ये सांगत उपस्थितांना अक्षरशः पोट धरून हसविले.अधून-मधून आपल्या कविता सादर करताना त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.आपल्या आयुष्यातील अनेक घटना व अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. कला व वाङमय या दोन्ही गोष्टींनी आपले व्यक्तिमत्व कसे घडते हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलींनी आपला आत्मविश्वास वाढविला तरच भिडेवाड्यात सावित्रीने गिरवलेल्या फळ्यावर पहिल्या अक्षराचा विजय होईल.असे त्यांनी मार्गदर्शन केले.

उपप्राचार्य दिपक बु-हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे संयोजक शरद तुपविहिरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला.संतराम बारवकर यांनी सुत्रसंचलन केले. तर कला मंडळ प्रमुख बाळासाहेब घिगे यांनी आभार मानले.

———=-=———-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button