इतर

भोळेवाडी येथील वीज वितरण चा इलेक्ट्रिक पॅनल बोर्ड बनला मृत्यूचा सापळा!

अकोले प्रतिनिधी 

वीज वितरण च्या भोंगळ कारभाराने भोळेवाडी येथील शेतकरी जीवमुठीत  धरून काम करत आहे गेल्या अनेक दिवसापासून वीज वितरण कडे  डी पी ची  केबल आणि कट आउट  ची मागणी केली जात आहे मात्र ग्रामस्थ व शेतकऱ्यांना वीज वितरण चे  निर्ढावलेले  अधिकारी सातत्याने हूलकावण्या येत आहे

 सदर मागणीची तक्रार खुद्द विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडे देऊनही हा प्रश्न  न सुटल्याने मुजोर  अधिकारी आमदारांना देखील दाद देत नाही काय?  असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे 

अकोले तालुक्यातील कोतुळ (भोळेवाडी) येथील ईलेक्ट्रीक पँनलबोर्ड  म्रुत्यूचा सापळा,बनला आहे

 संगमनेर विभागाचे विद्यूत अभियंता, राजूरउप विभागाचे  विद्यूत अभियंता यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही सदर अधीकाऱ्यांकडुन कुठलीही कार्यवाही झालेली नाही, त्यानंतर अकोल्याचे विद्यमान आमदार श्री किरण लहामटे यांच्याकडेही सदर विषयाची तक्रार घेऊन भोळेवाडी ग्रामस्थ गेले होते, आमदारांनी संबंधीत अधीकाऱ्यांना सदर पँनल बोर्ड बदलण्यासंबंधी आदेश दिलेले होते, पण पण संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांनाही दाद दिली नाही यामुळे भोळेवाडी येथील डीपीवरील हे विद्युत सर्किट ने एखाद्या  शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर दुरुस्ती होईल की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे 

 या  विद्यूत सर्किटवर  भोळेवाडीच्या तीन वाड्या व वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी आवलंबुन आहेत, ग्रामपंचायत ने याबाबत  निवेदन दिले असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे 

========

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button