शिक्षण व आरोग्य

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पाडोशी विद्यालयाच्या विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी


अकोले प्रतिनिधी

प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर, लोणी येथे दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १२ तालुक्यांतील अनेक विदयालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.


या स्पर्धेत मा. मधुकरराव पिचड विद्यालय, पाडोशी ता. अकोले जि. अहिल्यानगर येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ३,००० मीटर धावण्यात कुमारी जयश्री कैलास साबळे हिने द्वितीय क्रमांक, तर १,५०० मीटर धावण्यात कुमारी कोमल सुरेश साबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय मुख्याध्यापक आदिनाथ जाधव,क्रीडा शिक्षक भीमा दिघे,विठ्ठल बारामते, अर्चना सातपुते,शिवराज फटांगरे , नामदेव साबळे, संजय रेवगडे यांचे मोलाचे सहकार्याला लाभले.


या यशस्वी कामगिरीबद्दल आदर्श महिला विकास संस्था मालदाड रोड संगमनेर,किशोरीताई राघू जाधव (अध्यक्षा ) गणेश जाधव (संस्था रजिस्टर),नवनाथ जाधव (संस्था शिक्षण विस्ताराधिकारी),
संजय उकिर्डे (संस्था शिक्षण अधिकारी)सर्व पदाधिकारी, किसन साबळे (सरपंच),बहिरु साबळे (शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष) नोकरदार वर्ग, मुंबईकर, पाडोशी समस्त ग्रामस्थ,बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा शाखा, पाडोशी यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
तसेच या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कुमारी जयश्री साबळे आणि कुमारी कोमल साबळे यांची जिल्हास्तरीय वरून विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button