कळस बु शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निसाळ तर उपाध्यक्षपदी हुलवळे

अकोले प्रतिनिधी
कळस बु जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव निसाळ तर उपाध्यक्षपदी सोनाली हुलवळे यांची निवड झाली आहे.
अकोले तालुक्यात शैक्षणिक दृष्ट्या सर्वात मोठी शाळा असणाऱ्या कळस बु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी ही निवड करण्यात आली.
पालक सभेत सदस्यांची निवड करण्यात आली होती या मध्ये माजी अध्यक्ष शंकर किसन जाधव, अनिल देवराम वाकचौरे, सुरेश शांताराम वाकचौरे, सोमनाथ विलास कवडे, ज्ञानदेव अशोक निसाळ मनीषा ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, सोनाली जयराम हुलवळे, वनिता संदेश वाकचौरे, मनीषा सचिन चौधरी, दगडू सावंत, सोनाली विलास भुसारी, नयना शिरीष चव्हाण, शितल शिवाजी कातोरे, वसंत बाळासाहेब ढगे, शिक्षण तज्ञ दत्तात्रय शिवराम वाकचौरे, आरोग्य सेविका पुष्पा भुतांबरे, शिक्षक प्रतिनिधी सकाहारी दादाभाऊ दाते, यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून मुख्याध्यापक तान्हाजी खंडेराव वाजे यांनी कामकाज पाहिले.
श्री. ज्ञानदेव निसाळ हे अनेक वर्षांपासून शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहत होते. त्यांचे जिल्हा परिषद शाळेच्या कार्यक्रमांमध्ये मोलाचे योगदान आहे. ते भारतीय जनता पार्टीचे अकोले तालुका उपाध्यक्ष आहेत. सोनाली हुलवळे यांनी यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पद भूषवले आहे.
त्यांच्या या निवडीचे जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे गुरुजी, कळस सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, जयकिसान सहकारी दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामपंचायत प्रशासक राजेंद्र गवांदे, कळसेश्वर विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख वाकचौरे आदींनी अभिनंदन केले आहे.
======


