कोकणवाडी त पारंपारिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा.

प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
दि. ११
अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथे आदिवासी पारंपारिक पद्धतीने बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला
बैलपोळा या सणानिमित्त घराघरात उत्साह बघायला मिळाला. ग्रामदैवत बाल भैरवनाथ आणि शेतातील पिकाला चवार बांधून या सणाला सुरूवात झाली. दुपारी बैलांना स्वच्छ धुवून, सजवून, अंगावर झुली टाकून,बासिंग बांधून मंदिराकडे आणण्यात आले. शेतकऱ्यांच्या चेहर्यावरील आनंदही ओसंडून वाहत होता. सायंकाळी बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. काही तरुणांनी बैलांना सलामी देण्यासाठी भाग पाडले.श्री काळू सोमा जाधव यांच्या मधल्या वाड्याला पोळ्याचा मान असतो. सर्व शेतकऱ्यांची बैले सजवून आल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून, देवाला नारळ फोडून कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी गावतील ग्रामस्त, तरुण मित्र मंडळ, सरपंच सौ. सुलोचना जाधव,उपसरपंच श्री जगन लोहरे, श्री एकनाथ वाळू जाधव, श्री वाळीबा जाधव,श्री लक्ष्मण दुंदा जाधव,श्री महादू बेंडकोळी, श्री गुलाब गोड़े, श्री हिरामण जाधव, श्री तुकाराम दत्तु जाधव, श्री देविदास जाधव, श्री शंकर जाधव, श्री ज्ञानेश्वर जाधव, श्री तुषार जाधव, श्री जगण तुकाराम जाधव, माजी सरपंच श्री नारायण जाधव, हार्मोनियम वादक श्री विष्णू पांडू जाधव, श्री देवराम पुंजा जाधव, श्री सोमनाथ पांडू जाधव, श्री दिलीप बेंडकोळी, श्री नामदेव तुकाराम जाधव, श्री संपत बेंडकोळी, श्री सिताराम जाधव, श्री सतु दत्तु जाधव, परिर्वन कमिटीचे अध्यक्ष श्री प्रकाश निवृत्ती जाधव, श्री बाळू महादु जाधव,श्री ढवळा सखाराम जाधव, श्री पांडू लोहरे,श्री गोरख निवृत्ती जाधव, श्री भगवान काळू जाधव, श्री ज्ञानेश्वर अंतु जाधव,तसेच कामगार कमिटीचे श्री तुकाराम निवृत्ती बेंडकोळी, गीतकार श्री ज्ञानेश्वर दत्तु जाधव, श्री विठ्ठल दत्तु जाधव, श्री भागवत काळू जाधव महादर्पनचे प्रतिनिधी श्री संतु जाधव उपस्थित होते.



