नेप्तीचे बाबासाहेब शिंदे यांचे निधन,

अहिल्यानगर :प्रतिनिधी-
नगर तालुक्यातील नेप्ती येथील ज्येष्ठ नागरिक कै. बाबासाहेब सखाराम शिंदे वय ८९ वर्षे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आणि त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण नेप्ती गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
कै. बाबासाहेब शिंदे हे शिवसेना तालुका उपप्रमुख जालिंदर शिंदे यांचे वडील होते. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी आयुष्यभर अत्यंत कष्टाने, प्रामाणिकपणे आणि साध्या राहणीमानाने जीवन जगले. त्यांनी गावाच्या मंदिराच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच सरळ हाताने मदत केली. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, मितभाषी, शांत आणि सर्वांना आपलेसे करणारा होता.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. बाबासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ८ वाजता नेप्ती अमरधाम स्मशानभूमीत होणार आहे . त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



