इतर

अकोले पोलिसांच्या कारभाराची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

अकोले प्रतिनिधी

 बालविवाह सारख्या गंभीर प्रकरणात अकोले पोलिसां बाबत गंभीर आरोप  करत अकोले पोलिसांची  राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे 

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी व श्रीनिवास रेणुकादास    यांनी या तक्रारीत म्हटले आहे की दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी  अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ जवळ असलेल्या पांगरी या छोट्या गावात संबंधित तरुणाचा १५ वर्षाच्या मुलीबरोबर

बालविवाह होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. ती माहिती आम्ही लगेच पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे ,अकोले पोलीस निरीक्षक श्री बोरसे यांना कळवली. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने अकोले पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिले.

 परंतु  त्यानंतरचा घटनाक्रम असा की त्या वस्तीमध्ये सकाळी लग्न सुरू झाले अकोले पोलीस स्टेशन मधून त्या वस्तीमध्ये फोन गेला व जेवण रद्द करून तातडीने सर्वत्र सारवा सारव झाली व नवरीला तिथून दुसरीकडे हलवण्यात आले.. स्थानिक मिळालेल्या माहितीनुसार मुलाकडील व्यक्तींना नंतर अकोले पोलीस स्टेशनला बोलावून घेण्यात आले २०,००० रुपयांची त्यांच्याकडे मागणी करण्यात आली. त्यांनी ५००० रुपये दिले व तीन-चार महिने नवरीला माहेरी ठेवा व नंतर तुमच्या पद्धतीने काय करायचे ते करा असा सल्लाही देण्यात आला..

  बालविवाह सारखा संवेदनशील विषय एका मुलीच्या आयुष्याचे वाटोळे होत असताना सुद्धा अकोले पोलीस स्टेशन मधले पोलीस जर अगोदर माहिती पुरवणे, पैसे घेऊन मुलगी दुसरीकडे पाठवणे असे उद्योग करत असतील तर याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित नव्हे तर बडतर्फ करण्याची गरज आहे. आपण या प्रकरणाची चौकशी करावी  अशी मागणी केली आहे  तसेच

१) पोलिस निरीक्षक बोरसे यांनी माहिती दिलेले पोलिस,पांगरी गावचे पोलिस पाटील यांच्या मोबाईलची CDR तपासणी करून पोलिसांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली का ते तपासणे.

२) पोलिस पाटील यांनी गावातील ही माहिती न दिल्याबद्दल त्यांचे पद रद्द करणे

३) बालविवाह केल्याबद्दल बालविवाहाचा गुन्हा दाखल करणे. अशी मागणी हेरंब कुलकर्णी  ,श्रीनिवास रेणुकादास  यांनी केली आहे

———–=-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button