आदिवासी सेवक डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांचा आसाम येथे गौरव

अकोले प्रतिनिधी
आदिवासी सेवक डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना राष्ट्रीय अटल भारत गौरव सन्मान 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
निती आयोग भारत सरकार यांच्या अंतर्गत अवॉर्ड ट्रस्ट ऑफ इंडिया (ATI) व ओरा प्रोफाइल मॅनेजमेंट सर्विस ( NEFDI ) यांच्या वतीने राष्ट्रीय अटल भारत गौरव सन्मान 2025….. गुवाहाटी आसाम या राज्यात (ATI) यांच्यावतीने पार पडला.
त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महामहीम रमणजी ढेका साहेब ( राज्यपाल छत्तीसगड ) व डॉनुमल मोमीन साहेब,(विधानसभा उपसभापती) आसाम राज्य,व सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अली खान साहेब, तसेच .श्री डॉ.प्रदीप जगताप साहेब मुख्य आंतरराष्ट्रीय समन्वयक लंडन (युके).डॉ.संगीता त्रिपाठी मॅडम (संचालिका) निरम ग्रुप ऑफ इन्स्टंट्यूस्टेशन आसाम,डॉ. विजयकुमार गुप्ता साहेब,(अध्यक्ष) धुलियाजन नुमालिगड पाईपलाईन (NDPL ) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुवाहाटी आसाम येथे संपूर्ण भारत देशातील सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्व व उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे विविध राज्यातील दहा व्यक्तींची निवड करण्यात आली होती.

त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील डॉ.व्ही. व्ही. पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) मुंबई बदलापूर यांना राष्ट्रीय अटल भारत गौरव सन्मान 2025 या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाकरिता देश विदेशातील व विविध राज्यातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. व्ही. व्ही.पोपेरे हे गेले अनेक वर्षापासून ग्रामीण आदिवासी भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये समाजसेवेचे विविध उपक्रम राबवून समाजाप्रती मोठे योगदान देत आहेत, डॉ. पोपेरे यांना पुरस्कार प्रदान झाल्याने संपूर्ण शहरात व ग्रामीण भागामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे



