ग्रामीणशिक्षण व आरोग्य

ए.एस.के.फाऊंडेशन, आणि बायफ च्या पुढाकाराने जि. प. प्राथमिक शाळा रणद खुर्द येथे परसबाग प्रशिक्षण

एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी (ता अकोले) दि. ४


ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणद खुर्द येथे परसबाग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षणाला मुलांच्या सक्रिय सहभागामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले.

बायफचे श्री. राम कोतवाल यांनी परसबागेचे महत्व, लागवड, परसबागेचे प्रकार, जसे हंगामी परसबाग, बहुवर्षायू परसबाग तसेच कंदवर्गीय, वेलवर्गीय, मूळवर्गीय, शेंगवरगीय, पालेभाज्या, तसेच रानभाज्या इ विषयावर सविस्तरपने माहिती देऊन लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यासाठी ज्या शाळेत जागा नाही अशा शाळेत ग्रो बॅग मध्ये कसा भाजीपाला लागवड करायला पाहिजे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच त्यामध्ये मुलांनी पालेभाज्या चे बियाणे टोकन करून घेण्यात आले. ग्रो बॅग भरताना त्यामध्ये गांडूळखत तसेच माती एकत्रित मिक्स करून भरण्यात आली. शाळेत सुंदर अशी परसबाग लागवड करण्यात आली.

शाळा हे एक विकासाचे केंद्र बिंदू म्हणून ओळखले जाते. तसेच एक चांगले उदाहरण या शाळेत हंगामी परसबाग व बहुवर्षायू परसबाग व ग्रो बॅग मधील म्हणजेच टेरेस गार्डन मधे कसा भाजीपाला करायचा याचे छान उदाहरण रणद खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बघण्यास मिळते. शाळेत परसबागेत शेवगा, गवती चहा, चिकू, अंजीर, हादगा, कडीपत्ता, मेथी, शेपू, कोथांबिर, वाल इत्यादी रोपांची लागवड करण्यात आलेली आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे आणि बायफचे श्री. प्रदीप खोसे, श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे राम कोतवाल, विष्णु चोखंडे, निलेश आलवने यांनी केले.
हा प्रकल्प राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कातडे सर, उपध्यापिका हिरा देशमुख मॅडम यांनी केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button