शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी गोरक्षनाथ विटनोर तर व्हाईस चेअरमन पदी ज्ञानेश्वर शिरसाठ यांची बिनविरोध निवड-

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज बिनविरोध पार पडल्या. शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी राहुरीचे संचालक श्री गोरक्षनाथ विटनोर तर व्हाईस चेअरमन पदी पाथर्डीचे संचालक श्री ज्ञानेश्वर शिरसाठ यांची बिनविरोध निवड झाली. श्री गोरक्षनाथ विटनोर यांच्या निवडीची सूचना श्रीमती निर्गुणा बांगर यांनी मांडली व श्री बाळासाहेब तापकीर… यांनी अनुमोदन दिले तर श्री ज्ञानेश्वर शिरसाट यांच्या निवडीची सुचना श्रीमती सरस्वती घुले मॅडम यांनी मांडली तर अनुमोदक म्हणून श्री महेंद्र भणभणे यांनी स्वाक्षरी केली.
आज शिक्षक बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जिल्हा उप निबंधक कार्यालयातील सहायक निबंधक श्री बाळकृष्ण शिंदे साहेब व महेश पालवे यांच्या उपस्थितीत या निवडी पार पडल्या.
यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे ,दत्ता पाटील कुलट ,गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, संतोष दुसुंगे, अर्जुनराव शिरसाट, बाबा खरात ,विद्याताई आढाव, साहेबराव अनाप, शरद भाऊ सुद्रिक, बबन दादा गाडेकर, रविकिरण साळवे, विठ्ठल काकडे, राजेंद्र ठोकळ प्रल्हाद भालेकर, बाबा डुकरे, बाळासाहेब कदम, शरद वांढेकर, राजेंद्र कुदनर, आदी माननीय उपस्थित होते.
यावेळी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे गोकुळ कळमकर, साहेबराव अनाप,अर्जुनराव शिरसाठ, संतोष दुसुंगे, बबन दादा गाडेकर, बाळासाहेब कदम,विठ्ठल काकडे, रवीकिरण साळवे, विद्याताई आढाव, विजय ठाणगे, संदीप मोटे, शशिकांत जेजुरकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून गुरुमाऊली सदिच्छा मंडळाने चालवलेला सभासद हिताचा कारभार यापुढेही सुरू राहील. नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन सभासदांच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करतील. राज्यातील आदर्शवत शिक्षक बँकेचा कारभार सुरू आहे व तो यापुढेही सुरू राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी चेअरमन बाळासाहेब तापकीर व माजी व्हाईस चेअरमन योगेश वाघमारे यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
यावेळी व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर शिरसाठ व चेअरमन गोरक्षनाथ विटनोर यांनी शिक्षक बँकेचा कारभार पारदर्शीपणे करू अशी ग्वाही दिली.
यावेळी रा.वि.शिंदे,कैलास सारोक्ते, अण्णासाहेब आभाळे, माणिक कदम, कारभारी बाबर, रामेश्वर चोपडे,शिवाजी कराड साहेब, महेश भनभने, निर्गुणाताई बांगर, सरस्वती घुले, कल्याण लवांडे,सचिन नाबगे, आबासाहेब दळवी, बाळासाहेब कापसे, नवनाथ तोडमल, रवींद्र पिंपळे, संदीप ठाणगे, सुनील शिंदे, संदीप होले, निवृत्ती धुमाळ, भिमराव चाचर , मिनिनाथ देवकर,रामदास दहिफळे,भाऊसाहेब दातीर,राहुल खराडे, खंडूजी बाचकर योगेश खेडकर, व विजय कडूस संजय सोनवने चंद्रकांत गट, कैलास सहाने श्री बाळसाहेब कदम सुनिल शिंदे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश नांगरे यांनी केले तर आभार आबासाहेब दळवी यांनी मानले.



