इतर

नेप्तीत दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन

अहिल्यनगर प्रतिनिधी

-नगर तालुक्यातील नेप्ती येथील चौरे मळ्यातील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री गुरुदेव दत्त कृपेने गुरुवर्य प. पू. वै. धुंडा महाराज यांच्या आशीर्वादाने दत्त सेवा मंडळ व चौरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात केले आहे .श्री दत्त जयंती उत्सव, गुरुचरित्र व ज्ञानेश्वरी पारायणाने ४२ वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रामदास फुले यांनी दिली आहे.


शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत कीर्तने व धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. देवराम फुले महाराज नेप्ती यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कलश स्थापना व श्री दत्त चरित्र पारायणाने सप्ताहाची सुरुवात होईल. ह.भ.प. माधवबाबा महाराज इंगोले आळंदी देवीची यांचे शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते ११ यावेळी कीर्तन होणार आहे .शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. महंत रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान यांचे कीर्तन होईल तर
३० नोव्हेंबर रोजी ह.भ.प. हरिभाऊ महाराज भोंदे पिंपळगाव माळवी,
१ डिसेंबर रोजी ह.भ.प. श्रीकृष्णकृपांकित विकासानंदजी महाराज मिसाळ संत पंढरी पिंपळगाव वाघा,
२ डिसेंबर रोजी ह.भ.प. देविदास महाराज अडभाई चांदा,
तर ३ डिसेंबर रोजी ह.भ.प. सूर्यदर्शन महाराज कारखेले पाथर्डी यांचे कीर्तन होणार आहे. या सर्व दिवसांत विविध भजन मंडळे आपली सेवा देणार आहेत.

दत्तजयंतीनिमित्त गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ह.भ.प. मुकुंद महाराज जाटदेवळे यांचे सायंकाळी चार वाजता दत्त जन्माचे किर्तन होईल. तर रात्री ९ ते ११ या वेळेत ह. भ .प .राऊत दादा महाराज पिंपळा यांचे कीर्तन होणार आहे. त्याच दिवशी ६ वा. पालखी सोहळा, दिंडी, भक्तनाम सप्ताह आणि भजनसेवा उत्साहात पार पडणार आहे.

सप्ताहाचा समारोप ५ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे ताहराबाद यांचे काल्याचे किर्तने होणार आहे . त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच संपूर्ण सप्ताहात ह.भ.प. शंकर महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ ते अकरा व दुपारी दोन ते चार या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. परळीकर भजनी मंडळ पहाटे चार वाजता काकडा भजन करणार आहेत. दररोज सकाळी आठ वाजता विष्णू सहस्त्रनाम दहा वाजता गाथा भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
या पवित्र सप्ताहाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घ्यावा, असे आवाहन दत्त सेवा मंडळ, चौरे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button