अप्पर राज्य कर आयुक्त वसंतराव पिचड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न.

क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा
अकोले प्रतिनिधी
मुंबई येथून सेवा निवृत्त अप्पर राज्यकर आयुक्त वसंतराव पिचड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
माध्यमिक विद्यालय पिंपरकणे ता अकोले येथे आयोजित दोन दिवसीय संस्थांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. बी. एम. महाले होते.
संस्थेद्वारे आयोजित क्रीडा स्पर्धेत सांघिक आणि मैदानी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जीएसटी इन्स्पेक्टर
विशाल पिचड, रोहिदास जंगले आणि कवी तानाजी सावळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्राचार्य संजय कडलग, शंकर लांडे, मंदाताई कचरे, भावनाताई पिचड, विलास सावंत आणि प्रा. के. बी. नाईकवाडी यांनी आपल्या मनोगतातून वसंतराव पिचड यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नितीन आरोटे यांनी केले, सूत्रसंचालन भास्कर येलमामे यांनी केले तर आभार संगीता एखंडे यांनी मानले.

कार्यक्रमास मनोहर पिचड, विश्वनाथ चौधरी, संतोष दिघे, युवराज ठिगळे, उपसरपंच निवृत्ती ठिगळे, चिंतामण पिचड, दिलीप पिचड, भाऊसाहेब पिचड, ललित छल्लारे, गोरक्षनाथ वाकचौरे, किसन काळे यांच्यासह पिंपरकणे, टाहाकारी, कोंभाळणे येथील विद्यालयांचे शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीएसटी इन्स्पेक्टर विशाल पिचड, रोहिदास जंगले आणि कवी
तानाजी सावळे यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा तसेच कला क्षेत्रात प्रगती करावी, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.


