इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०९/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १९ शके १९४७
दिनांक :- ०९/०१/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- सप्तमी अहोरात्र,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति १३:४१,
योग :- शोभन समाप्ति १६:५६,
करण :- विष्टि समाप्ति १९:४०,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- धनु – पुर्वाषाढा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वृद्धितिथी दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ११:११ ते १२:३६ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२७ ते ०९:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:५० ते ११:१३ पर्यंत,
शुभ मुहुर्त — दुपारी १२:३६ ते ०१:५९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा १९:४० प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १८ शके १९४७
दिनांक = ०९/०१/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. घरातील टापटीपीवर लक्ष द्याल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. भागीदाराशी संबंध सुधारतील. तुमचा परिचय अधिक वाढेल.

वृषभ
हाताखालील नोकरांकडून कामे जलद गतीने पार पडतील. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवस मजेत जाईल.

मिथुन
जुकरमणुकीवर अधिक बर द्याल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. स्वच्छंदीपणे विचार कराल.छंद जोपासाल.

कर्क
कामातील अडचणी दूर कराव्यात. उत्साहाने कामे हाती घ्याल. कामामुळे थकवा जाणवू शकतो. तत्परतेने कामे कराल.वादाचे प्रसंग टाळावेत.

सिंह
जुन्या गोष्टी फार मनावर घेवू नयेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पायाचे विकार जाणवतील. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. झोपेची तक्रार जाणवेल.

कन्या
कुटुंबाच्या प्रगतीचा आधी विचार कराल. आर्थिक उन्नती साधता येईल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. स्थावर मालमत्ता वाढवाल. घराचे नुतनीकरण कराल.

तूळ
कामात सकारात्मक बदल करावेत. कामाची गती वाढेल. मनाजोगा फायदा करून घेता येईल. व्यापाऱ्यांनी सतर्कता दाखवावी. सरकारी कामावर वेळ खर्च होईल.

वृश्चिक
चुकीच्या संगतीत अडकू नका. मनात आकारण भीती बाळगू नका. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील.धार्मिक कामात सहभाग घ्याल.

धनू
काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. जवळचे मित्र भेटतील.एकाच गोष्टीवर फार काळ रेंगाळत राहू नका.

मकर
जोडीदाराचे कौतुक कराल. सामाजिक वजन वाढेल. नावलौकिकास पात्र व्हाल. अपेक्षित वेळेत कामे पूर्ण होतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ
कामावर श्रद्धा ठेवाल. वैचारिक भव्यता दाखवाल. बौद्धिक दृष्टीकोनातून विचार कराल. दानशूरता दाखवाल. स्वत:चा मान जपाल.

मीन
मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button