आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२९/१२/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०८ शके १९४७
दिनांक :- २९/१२/२०२५,
वार :- इंदूवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०१,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १०:१३,
नक्षत्र :- रेवती समाप्ति ०७:४१, अश्वीनी ३०:०५,
योग :- परीघ समाप्ति ०७:३६, शिव २८:३१,
करण :- तैतील समाप्ति २१:०६,
चंद्र राशि :- मीन,(०७:४१नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- धनु – पु. षा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- बुध – धनु ०७:२४,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:२४ ते ०९:४६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त:- सकाळी ०७:०१ ते ०८:२४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:४६ ते ११:०९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:१६ ते ०४:३९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:३९ ते ०६:०१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
दशमी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०६ शके १९४७
दिनांक = २९/१२/२०२५
वार = इंदूवासरे(सोमवार)
मेष
बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.
वृषभ
आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.
मिथुन
नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुगारातून लाभ संभवतो.
कर्क
अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.
सिंह
कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.
कन्या
कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.
तूळ
इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.
वृश्चिक
लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.
धनू
दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.
मकर
जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.
कुंभ
फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.
मीन
कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


