यंदा पावसाळा भरपूर,रखडलेले लग्नकार्य मोठ्या प्रमाणात होणार!

15 एप्रिल नंतर युद्धाचे सावट कमी होईल
अकोले प्रतिनिधी
यावर्षीचा येणारा पावसाळा सरासरी पूर्ण करून पाऊस चांगला पडेल,पीक- पाणी, उत्तम राहील, राजा आणि प्रजा सुखी राहील रखडलेले लग्न कार्य मोठ्या प्रमाणात होतील असे भाकित आंभोळ तालुका अकोले जिल्हा अहिल्या नगर येथील ज्योतिष अभ्यासक वाळिबा चौधरी यांनी केले आहे
श्री चौधरी यांनी संपूर्ण सहदेव भाडळी या ग्रंथाच्या आधारे हे भाकीत वर्तविले आहे दरवर्षी ते पाऊस पाण्याचे अंदाज वर्तवित असतात
साठ संवत्सरा पैकी चाळीसावे पराभवनाम संवत्सराची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत आहे या संवत्सराचा स्वामी केतू आहे मराठी नवीन वर्षाची सुरवात चैत्री पाडव्या पासून होत आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी या वर्षातील भाकीत वर्तविले आहे
यावर्षीचा पाडवा गुरुवारी आल्याने वार परत्वे संवत्सर फल रोगराई कमी करेल, वस्तू स्वस्त होतील, प्रजा धर्माने वागेल, पाऊस उत्तम राहील, धनधान्य पुष्कळ होईल, जेष्ठात अधिक मास आल्याने येणाऱ्या काही दिवसात मोठ्या राजकीय नेत्याचा घात पाती मृत्यू संभावतो तर सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धाचे सावट 15 एप्रिल नंतर कमी होईल असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे
==========


