आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते माका येथे विकास कामांचे लोकार्पण

माका प्रतिनिधी
लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ५५ लक्ष रुपये किंमतीच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ त्यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब मामा वाघ, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, भाजप तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, राजू काका मते, भाऊसाहेब जावळे, संभाजी लोंढे, सरपंच प्रमोद गजभार, सरपंच अंकुश धंदक, सरपंच सतीशराव काळे, सरपंच अनिल घुले, सरपंच सतीश कर्डिले, अविनाश

वाघमोडे, कासार साहेब, आकाश चेडे, कावरे नाना, किरण शिंदे, मच्छिंद्र मुंगसे, बाळासाहेब शिरसागर,माऊली गंगावणे, अण्णा गर्जे, गणेश लंघे, आदिनाथ माने, नवनाथ माने, साहेबराव होंडे, सहदेव भाऊ लोंढे, आबासाहेब पालवे, कचरू सानप, अशोकराव चव्हाण, कानिफनाथ जगताप,जगन्नाथ भगत यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तसेच माका येथील ग्रामस्थ, महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



