इतर

अकोले विधानसभा  मतदार संघाच्या प्रारूप मतदार यादीत 16,430 मतदार वेगळले!

अकोले प्रतिनिधी 

निवासाच्या ठिकाणी गैरहजर (721) स्थलांतरित झालेले (6,708) मृत झालेले (5,474) अन्यत्र नोंदणी झालेली  दुबार (-3,501)  गणना प्रपत्र भरून देण्यास नकार देणे इ.(-26)अशा वेगवेगळ्या कारणाने अकोले विधानसभा सभा मतदार संघातील  16,430 मतदार प्रारूप मतदार यादीतून वेगळले आहे अकोल्याचे तहसीलदार मनोज मोरे यांनी दिली  विशेष सखोल पुनरीक्षण- 2026 अंतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार दिनांक 31.08.2026 रोजी २१६ अकोले (अ.) विधानसभा मतदारसंघाच्या सर्व 300 मतदान केंद्राच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी २१६ अकोले (अ.ज) विधानसभा मतदारसंघात एकुण 2,68,681 इतके मतदार होते. प्रारूप मतदार यादीमध्ये यापैकी 2,52,261 इतके मतदार समाविष्ट करण्यात आले असुन त्यामध्ये 1,32,596 पुरुष मतदार, 1,19,654 महिला मतदार आणि 01 तृतीयपंथी मतदार आहेत.

प्रारूप मतदार यादीमध्ये जुन्या मतदार यादीतील 16,430 (6.12%) मतदारांचा समावेश खालील कारणामुळे त्यांचे गणना प्रपत्र प्राप्त न झाल्यामुळे होऊ शकलेला नाही:

भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार या प्रारूप यादीच्या अनुषंगाने पुढील एका महिन्याच्या कालावधीत (दि.31.08.2026 ते दि. 30.09.2026) दावे व हरकती दाखल करण्याची संधी आहे. ज्या पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली नसतील तसेच 01.10.2026 या अर्हता दिनांकास किंवा त्यापुर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रपत्र- 6 त्यासोबतच्या घोषणापत्रासह भरता येईल ज्यायोगे योग्य पडताळणीनंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) सदर प्रपत्रावर उचित निर्णय घेतील व पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील. मतदार यादीमधील एखाद्या नावाबाबत आक्षेप असल्यास, संबंधित मतदार संघातील मतदार असलेली व्यक्ती प्रपत्र-7 मध्ये आक्षेप नोंदवू शकेल. मतदार यादीमधील नोंदीमध्ये काही सुधारणा करावयाच्या असल्यास (उदा. मतदाराचे नाव, पत्ता, वय, लिंग इ.) संबंधित मतदार प्रपत्र- 8 द्वारे अशी विनंती करु शकेल.

मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते.

 दावे व हरकतीच्या कालावधीत मतदान केंद्र निहाय दाखल करण्यात आलेल्या दावे व हरकतींच्या याद्या मतदान नोंदणी अधिकारी यांच्याकडुन प्रत्येक आठवड्यास तयार करण्यात येतील. अशा याद्या जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करुन देण्यात येतील. प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु 2002-2004 च्या मतदार यादीतील नोंदीशी जुळवणी न झालेल्या (Unmapped Electors) 5,056 तसेच जुळवणी झालेल्या परंतु तार्किक विसंगती (Logical Discrepancies) 11,750

आढळलेल्या मतदारांना मतदान नोंदणी अधिकारी यांच्याकडुन नोटीसा बजावण्यात येतील. संबंधित मतदारांनी भारत निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या कागदपत्रांपैकी किंवा अन्य कोणतेही वैध कागदपत्र सादर केल्यानंतर त्याची योग्य ती पडताळणी करुन निर्णय घेण्यात येईल.

२१६ अकोले (अ.ज) विधानसभा मतदारसंघात एकूण 01 मतदार नोंदणी अधिकारी असून 23 सहायक मतदार नोंदणी अधिकारी अधिसूचित करण्यात आलेले आहेत. दावे व हरकती तसेच नोटिशींच्या अनुषंगाने कार्यवाही त्यांच्या स्तरावरून दि. 31-08-2026 ते दि. 29-10-2026 या कालावधीत पुर्ण करण्यात येईल. ही कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार दि. 4.11.2026 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी आलेला अर्ज विहित कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी नाकारल्यास संबंधित मतदारास विहित कागदपत्रांची पुर्तता करुन नव्याने अर्ज करता येईल किंवा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मधील कलम 24 मधील तरतुदीनुसार अपिल दाखल करता येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणापूर्वी २१६ अकोले (अ.ज) विधानसभा मतदारसंघात एकुण मतदान केंद्रांची संख्या 307 इतकी होती. त्यामध्ये 02 नवीन मतदान केंद्रांची भर पडली . त्यामुळे आता एकुण मतदान केंद्रांची संख्या 309 इतकी झाली आहे.असल्याची माहिती यावेळी तहसीलदार मनोज मोरे, नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी  पत्रकारांना दिली 

====

 या प्रारूप मतदार यादया भारत निवडणूक आयोगाचे Voter Service Portal राज्य यांचे

संकेतस्थळ https://votere.eci.gov.in/ , मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र https://cepelection.maharashtra.gov.in/ceo/) संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. या प्रारूप मतदार याद्या सॉफ्ट तसेच हार्ड प्रतिमध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हास्तरावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पुनरीक्षणापूर्वीच्या मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांची नावे या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट करता आलेली नाहीत अशा मतदारांच्या नावाच्या याद्या (गैरहजर/स्थलांतरित/मृत/दुबार/इतर-ASDDO) त्याबाबतच्या कारणासह उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच या याद्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या सूचना फलकावर सुध्दा प्रदर्शित करण्यात येत आहेत.मनोज मोरे तहसीलदार, अकोले 

मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी आलेला अर्ज विहित कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी नाकारल्यास संबंधित मतदारास विहित कागदपत्रांची पुर्तता करुन नव्याने अर्ज करता येईल किंवा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मधील कलम 24 मधील तरतुदीनुसार अपिल दाखल करता येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणापूर्वी २१६ अकोले (अ.ज) विधानसभा मतदारसंघात एकुण मतदान केंद्रांची संख्या 307 इतकी होती. त्यामध्ये 02

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button