इतर

आष्टा येथे एनसीसीच्या वतीने ‘टीबी मुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती

प्रतिनिधी / एस. के. जाधव
आष्टा : दि. १०
महाराष्ट्र बटालियन, पुणे यांच्या आदेशानुसार तसेच 16 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सांगली यांच्या आदेशानुसार ग्रामीण रुग्णालय, आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे बुधवार, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी ‘टीबी मुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी आर्मी सीनियर डिव्हिजन विभाग प्रमुख कॅप्टन नवनाथ लवटे यांनी केले. त्यांनी टीबी मुक्त अभियानाचे महत्त्व, टीबीचा प्रतिबंध तसेच आष्टा व परिसरात भविष्यात राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहिती कॅडेट्सना दिली.


कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. डॉ. प्राची पाटील, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, दुधगाव रोड, आष्टा यांनी टीबीविषयी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच सौ. निता कोरे, टीबी सुपरवायझर, पंचायत समिती वाळवा यांनी टीबीची लक्षणे, प्रतिबंध, तपासणी व उपचार याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देवकाते व्ही. एस. यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिप ऑफिसर मनोज फिरंगे यांनी केले, तर आभार ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री. जाधव डी. एस. यांनी मानले. यावेळी श्री. बोरकर आर. टी., आरोग्य सहाय्यक, आष्टा तसेच सेकंड ऑफिसर अभिषेक साळुंखे, एनसीसी अधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमात सीनियर आर्मी डिव्हिजनचे 42 व ज्युनिअर आर्मी डिव्हिजनचे 40 अशा सुमारे 90 एनसीसी कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभियानांतर्गत निबंध लेखन व चित्रकला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.सीनियर व ज्युनिअर डिव्हिजनच्या कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


कार्यक्रमाचे नियोजन कॅप्टन नवनाथ लवटे, चिप ऑफिसर मनोज फिरंगे व सेकंड ऑफिसर अभिषेक साळुंखे यांनी केले. टीबीविषयी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करून ‘टीबीमुक्त आष्टा व परिसर’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक श्री. देवकाते व्ही. एस. यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button