पारनेर चे रुपेश ढवण यांचा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

दत्ता ठुबे
पारनेर तालुक्यातील निघोज येथील आपली माती
आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश
ढवण यांनी बुधवार दि.५ रोजी मुंबई येथे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ढवण यांना पंचा घालून
सत्कार केला असून राजकारण करताना सामाजिक कामांच्या माध्यमातून सेवाभाव महत्वाचा असून लोककल्याणकारी कामांना पाठबळ देउन परिसर
विकासाभिमुख झाला पाहिजे. यासाठी सातत्याने
प्रयत्नशील राहण्याचा सल्ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांनी ढवण यांना दिला . गेली पाच वर्षांपासून
ढवण हे आपली माती आपली माणसं या सामाजिक
संस्थेच्या माध्यमातून निघोज व परिसरात कार्यरत
असून वृक्षारोपण, सामाजिक कामांच्या माध्यमातून

शासकीय कार्यालयात जाऊन लोकांच्या प्रश्नांची
सोडवणूक करणे. तसेच लोकांच्या सुखादुखात
सहभागी होऊन जनसामान्यांना संघटीत करण्याचे
काम ढवण यांनी केले आहे. सामाजिक कामे करताना अडीअडचणीचा मुकाबला करताना प्रशासकीय पातळीवर काम करतांना अडचणी येतात यासाठी राजकीय पक्षाची मदत घेण्याची गरज लागते. देशाचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री मंत्री पद भुषवताना शेतकऱ्यांना ८० हजार कोटी कर्जमाफी देउन शेतकऱ्यांनामोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ
दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा
मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. सामाजिक
काम ८० टक्के ही पवार यांची भुमिका मला भावली
असून पवार हेच देशाचे खरे विकासाभिमुख नेते
असल्याची मानसिकता माझी झाली असल्याने
मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असल्याची
प्रतिक्रिया ढवण यांनी व्यक्त केली आहे.



