इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि. ०४/०८/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १३ शके १९४७
दिनांक :- ०४/०८/२०२५,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति ११:४२,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति ०९:१३,
योग :- ब्रह्मा समाप्ति ०७:०५,
करण :- वणिज समाप्ति २४:३२,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०९प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:४६ ते ०९:२२ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:०९ ते ०७:४६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४८ ते ०५:२५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:२५ ते ०७:०१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
शिवमुष्टि, (तीळ), दग्ध ११:४२ नं., भद्रा २४:३२ नं., एकादशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १३ शके १९४७
दिनांक = ०४/०८/२०२५
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
अविचाराने वागून चालणार नाही. परिस्थितीनुरूप संयम बाळगावा. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. काही बदल त्रस्त करू शकतात. समस्या निराकरणाचे उपाय सापडतील.

वृषभ
मुलांच्या आवडी निवडी पुरवाल. काही सवयी बदलून पहाव्यात. मेहनतीला पर्याय नाही. विलंबाने का होईना पण यश मिळेल. मनाप्रमाणे दिवस घालवाल.

मिथुन
अवास्तव खरेदीचा मोह टाळावा. मन काहीसे सैरभैर राहील. समोरील प्रत्येक गोष्टीत रममाण व्हाल. आज प्रेमाची अनुभूति येईल. निराशा टाळून कामाला लागावे.

कर्क
प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. आपली आकांक्षा पूर्ण होईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. समोर आलेली संधी ओळखावी.

सिंह
खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. जोडीदाराच्या वागण्याचा अचंबा वाटेल. धार्मिक कामात मन गुंतवाल. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनुभावातून धडा घ्याल.

कन्या
सामाजिक बांधीलकी जपा. व्यावसायिक चढउताराकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नवीन अनुभावातून शिकाल.

तूळ
अचानक धनलाभ संभवतो. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.

वृश्चिक
नातेवाईकांकडून सुखद बातमी मिळेल. आनंददायी दिवस राहील. भागीदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. भावनिक घटना घडू शकतात.

धनु
घरगुती वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. उगाचच मनात चिंतांना घर करू देऊ नका. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

मकर
कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रकृतीची हेळसांड करू नका. मनोरंजनाकडे अधिक कल राहील. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. कामाचा ताण जाणवू शकतो.

कुंभ
सार्वजनिक बाबीत सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पळावीत. मेहनतीला पर्याय नाही.

मीन
जोडीदाराच्या सहवासात रमाल. मनातील गैरसमज दूर होतील. आवडता छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. अति शिस्तीचा बडगा करू नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button