श्री बाळेश्वर विद्यालयात शिक्षक दिन साजरा

संगमनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री बाळेश्वर माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे विद्यालयाचे प्राचार्य उत्तम खांडवी, विद्यार्थी प्राचार्य योगेश्वरी फटांगरे, विद्यार्थी पर्यवेक्षक वैष्णवी किनीकर, शिक्षक व विद्यार्थी शिक्षक यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या गुरुजनांचा गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार केला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती सांगितली आजच्या विद्यार्थी शिक्षक यांनी शिक्षक झाल्याचा अनुभव सांगितला शिक्षक हे एकमेव व्यक्ती आहेत का जे विद्यार्थ्यांना घडवत असताना आपला विद्यार्थी हा आपले दैवत मानत असतो. शिक्षक दिन का साजरा केला जातो हे सांगितले
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यार्थी प्राचार्य योगेश्वरी फटांगरे हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भविष्यात जर आपल्याला ध्येय साध्य करायचे असेल तर शरीर स्वस्त वेळेचे नियोजन अभ्यासातील सातत्य हे जर राखले तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आजच्या विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळा व शाळेचे कामकाज पाहताना मुख्याध्यापक कार्य खूप कठीण आव्हानात आहे हे मी आज अनुभवत असताना मला कळले आजच्या विद्यार्थी शिक्षकांच्या पाठाचे परीक्षण केले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री उत्तम खांडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आजचे विद्यार्थी शिक्षक हे नक्कीच उद्याचे गुणवंत शिक्षक होतील तसेच सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध भूमिका बजावत आज दिवसभर शालेय कामकाज उत्तम रित्या पार पाडले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून गाद्यांचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रम प्रसंगी मधुकर बांबळे, भाऊराव धोंगडे, सुरेश देशमुख, विकास सोनवणे, रघुनाथ मेंगाळ, विश्वास पोखरकर, चेतन सरोदे, संजय ठोकळ, अशोक जाधव, गंगाधर पोखरकर, विठ्ठल फटांगरे, मंगेश औटी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली चौधरी यांनी केले



