पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी राजापूर महाविद्यालयाच्या खेळाडूची निवड

संगमनेर दि 17
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा समिती आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा शैक्षणिक वर्ष 2025-26 राजूर महाविद्यालय,राजूर येथे झाल्या काल दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या (स्विमिंग) *पोहणे या मध्ये 100 मी. बॅक स्ट्रोक या प्रकारात महाविद्यालयाचा खेळाडू श्री. शुभम विकास दिघे (द्वितीय वर्ष वाणिज्य) याने सिल्व्हर मेडल मिळवले.
पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
राजापूर महाविद्यालयाचा खेळाडू शुभम विकास दिघे याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रविण गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले
क्रीडा विभागासाठी नेहमी प्रोत्साहन देणारे संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिल गोडसे साहेब, उपाध्यक्ष श्री.आर. पी. हासे साहेब,सचिव श्री ॲड.कैलास हासे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. वर्पे सर,सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले


