इतर

अकोले येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालययास  मंत्री मंडळाची मान्यता 

अकोले प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

 बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

अकोले येथे सध्या ‍दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तरची दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी अकोले येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. 

या न्यायालयासाठी २१ नियमित पदे मंजूर करण्यात आले आहेत व चार पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वेतन व वेतनेत्तर, तसेच अन्य खर्चासाठी २ कोटी ७९ लाख ३५ हजार ९३४ रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

 आदिवासी भागात वरिष्ठ सर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने अकोले तालुक्या तील आदिवासी भागातील जनतेची मोठी गैरसोय दूर झाली आहे यामुळे तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे 

००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button