टिटवाळा स्टेशनं परिसरातील बेशिस्त पार्किंग, रिक्षा वाहतूकीला लगाम घाला -तृप्तीताई गायकवाड

टिटवाळा दि 9 दुचाकी गाड्यांची बेशिस्त पार्किंग व बेशिस्त रिक्षा चालकांच्या व अवैध हातगाड्या व फेरीवाल्यांमुळे टिटवाळा शहराचा श्वास गुदमरला आहे सतत च्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने वृशदीप वात्सल्य सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई गायकवाड यांनी संताप व्यक्त केला असून याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे
सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई गायकवाड यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की टिटवाळा शहरात रिक्षा चालकांच्या मनमानी व बेशिस्त कारभारामुळे प्रवाशांना व शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन धक्काबुक्कीच्या घटना घडत आहेत आहेत अनेक रिक्षाचालक विनापरवाना रिक्षा चालवत असून याकडे आरटीओ विभाग दुर्लक्ष करत आहेत अनेक बेरोजगार तरुण यात उतरले असले तरी अवैध रिक्षा चालवणे व दारू सिगारेट गुटखा अशा नशिल्या अवस्थेत अनेक जन रिक्षा चालवतात याचा त्रास प्रवाशांना व शहरातील नागरिकांना होत आहे
टिटवाळा स्टेशन ते निमकर नाका पर्यंत असणारे दोनहीं बाजूची टू व्हीलर ची पार्किंग अडथळा ठरत आहे
टिटवाळा स्टेशन परिसरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे यात अनेक छोटे छोटे मुलं हे रिक्षा चालवतात लायसन आहे की नाही याबाबत कोणीही विचारणा करत नाही
दुचाकी च्या पार्किंग कडे प्रशासन दुर्लक्ष असून या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे असल्या ने वाहतूक कोंडी वाढत आहे
तसेच फेरीवाल्यांचा फेरीवाले अस्ताव्यस्तपणे रस्ता फूट पाथा वर ठाण मांडून बसतात यामुळे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे या सर्व प्रकाराकडे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, तसेच प्रादेशिक परिवहन विभाग(RTO) याकडे लक्ष देणार की नाही असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे नागरिकांचा रोष वाढत असल्याने प्रशासनाने तात्काळ पावले न उचलल्यास या प्रश्नाविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तृप्ती ताई गायकवाड यांनी दिला



