किमान वेतन व विद्युत क्षेत्रा करिता स्वतंत्र वेतन श्रेणीबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई दि 16 श्री गणेश ताठे, अध्यक्ष – किमान वेतन सल्लागार मंडळ, (राज्य मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य ) यांच्या उपस्थितीत आज अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ व ठेकेदार कामगार संघ (संलग्न – भारतीय मजदूर संघ) यांच्या प्रतिनिधींची बैठक मा. कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई (बांद्रा) येथे संपन्न झाली.
बैठकीत किमान वेतनाच्या अंमलबजावणीतील प्रलंबित प्रश्न तसेच वीज कामगारांसाठी स्वतंत्र वेतन श्रेणी निर्माण करण्याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. व निवेदन सादर करण्यात आले
या चर्चेत अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस श्री. सचिन मेंगाळे, महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे विरेंद्र मोहिते. ,पदाधिकारी श्री.प्रशांत माहुरे, धीरज जनबंधु, गणेश सोनावणे , यतीश कानडे ,अरुण रसाळ, रविकुमार गाडे ,अतुल गवते, युवराज कोळेकर, गणेश इंगोले, अक्षय मुळे ,रुदेश्वर म्हस्के, मयूर वाव्हळ , सचिन कंगणे,विरेंद्र मोहिते,दीपक कोकणे आणि अन्य संघटनेचे प्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या प्रसंगी श्री गणेश ताठे यांनी ठेका कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असे मनोगत व्यक्त केले. व प्रलंबित किमान वेतन दर, स्वतंत्र वेतन श्रेणी बाबत सकारात्मक निर्णय लवकरच घोषित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
मा


