अकोल्याचे सुपुत्र डॉ.व्ही. ही. पोपेरे यांचा ‘आसाम’ ला होणार सन्मान!

एस. के.जाधव /प्रतिनिधी
कोकणवाडी (अकोले )दि. १७ – नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य, भारत सरकार निती आयोग यांच्या विशेष सहयोगाने अवॉर्ड ट्रस्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या वतीने अकोल्याचे सुपुत्र डॉ व्ही व्ही पोपेरे यांचा आसाम राज्यात सन्मान होणार आहे
आसाम राज्यात गुहाटी येथे अटल भारत गौरव सन्मान 2025 या राष्ट्रीय पुरस्कारा साठी डॉ. व्ही. ही. पोपेरे यांची निवड झाली असून सदर पुरस्कार छत्तीसगड चे महामाहीम राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी डॉ. पोपेरे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉक्टर पोपेरे हे महाराष्ट्रातील ग्रामीण आदिवासी भागातील ठाणे, पालघर,नाशिक, पुणे, रायगड, आहिल्यानगर या जिल्ह्यातील आदिवासी समाजाची गेली 27 वर्षापासून सेवा करत आहेत. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, बेरोजगार शिबिर राबवणे, महिलांकरिता ब्युटी पार्लर व रोजगार भिमुख कार्यक्रम राबवणे, जनजागृती अभियान शिबिर राबवणे,अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर या सह, शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवणे चे उल्लेखनीय काम करत आहेत. त्यांना इंग्लंड देशाच्या वतीने विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. गोवा , जम्मू-काश्मीर , कोलकत्ता , दिल्ली या ठिकाणी त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. याची दखल घेत
डॉ. पोपेरे यांचा दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी आसाम राज्यात गुवाहाटी येथे अटल भारत गौरव सन्मान 2025 या
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होत आहेत . पोपेरेवाडी (कोंभाळणे) तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील या सुपुत्राचा सन्मान होत असल्याने अकोले तालुका तसेच राज्यभरातील विविध आदिवासी संघटनेने पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे



