इतर

सोनई येथे तरुणास लाकडीदांडक्याने मारहाण ,११ जणांवर गुन्हा दाखल

दत्तात्रय शिंदे /प्रतिनिधी –

नेवासा तालुक्यातील सोनई येथे जुन्या वादातून एका युवकास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गावात दंगल नियंत्रण पथक कार्यरत करण्यात आले आहे.

शनिवारी (ता. १९) रात्री आठ वाजता एका रुग्णालयासमोर संजय ऊर्फ गोंड्या नितीन वैरागर यास हाताने व लाकडी दांड्याने हात, पाय व तोंडावर बेदम मारहाण करण्यातआली.
नितीन केशव वैरागर यांनी फिर्याद दिल्यानंतर संभाजी लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण, विशाल वने, महेश दरंदले, शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्नील भळगट, हासने (नाव माहीत नाही) व संभाजी लांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना झाल्यानंतर नातेवाईकांनी जखमी युवकास पोलिस ठाण्यात आणले. सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्यासमोर ठेवून आरोपीस अटक करण्याची मागणी
केली. आवारात मोठा जमाव जमल्याने वातावरण तणाव निर्माण झाला होता.

नितीन शिंदे यास अटक करण्यात आली आहे श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षकांचे एक, तर सोनई पोलिस ठाण्याचे तीन पथक आरोपींचा शोधघेत आहे. दंगल नियंत्रण पथक,दोन अधिकारी व ३६ पोलिस कर्मचारी बंदोबस्तात कार्यरत केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. बेदम मारहाण व अॅट्रॉसिटीचा गुन्ह दाखल करण्यात आल्यानेअधिक तपास कर्जतचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे
तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button