इतर

वाकी, खिरविरे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसगट पीकविमा दया -डॉ.अनंत घाणे 

अकोले/प्रतिनिधी

      अकोले तालुक्यातील वाकी, खिरविरे महसूल मंडळातील अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट पिकविमा देण्याची मागणी करत डॉ.अनंत घाणे यांनी अकोले तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसेच अकोले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.भात पिकाचे दाणे काळे पडले आहेत. तसेच सततच्या जोरदार पाऊस पडत असल्याने जे भात पिक काढायला आले आहे.त्याचे दाणे निखळून पडत आहेत.कापलेल्या भाताचे दाणे गळून पडत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेती पिकाला हमिभाव नाही. गुंतवलेले भांडवल तसेच मजुरी यासाठी गुंतवलेले पैसे कसे दयायचे या विवंचनेमध्ये शेतकरी अडकला असून शेतकऱ्याचा कोणी वाली उरला नाही.आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी पुर्णपणे उद्धस्त झाला आहे. तोंडी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने पुर्णपने ओडला आहे.

माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजसेवक डॉ.अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली  वारंघुशी तसेच वाकी,खिरविरे,एकदरे या ग्रामस्थांनी कृषी विभाग अकोले तसेच तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

      यावेळी समाजसेवक डॉ.अनंत घाणे,मारुती खाडे,अंकुश भवारी,गौतम खोले,राजू भवारी,विठ्ठल भांगरे,लालू साबळे,गुलाब लांडगे,विनायक घाणे,शंकर घाणे तसेच सर्व शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

——-====—-=

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button